केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांच्या आर्थिक विकासासाठी केंद्रीय गृमंत्रालयाने ४१ विविध प्रकल्पांच्या प्रस्तावावर विचार करण्यास सुरूवात केली आहे.
अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार यांच्यासाठी हॉटेल व्यावसायिक ताज एक्झोटिका, आरडीएस रोड कन्स्ट्रक्शन, अरूण हॉस्पिटल, हादवेट रिसॉर्ट, अंदमान कोल्ड चेन अशा प्रकारच्या विविध प्रकल्पांचा समावेश होतो.
हे ही वाचा:
निसर्ग पर्यटनासाठी ‘स्वर्गात’ हालचाली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
या सर्व प्रस्तावांवर सरकारने जानेवारी २०१९ मध्ये लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना चालना देण्यासाठी स्थापन केलेल्या लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार आयलँड डेव्हलपमेंट स्किम (एलएएनआयडीएस) याच्या अंतर्गत केला जाणार आहे.
व्यापार आणि उद्योगांना चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या डिपार्टमेंट फॉर प्रोमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) मार्फ आखण्यात आलेली ही योजना एमएसएमईजना विविध प्रकारे सवलती आणि प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या सवलती आणि प्रोत्साहन २५ मार्च २९२५ पर्यंत मिळणार आहे, आणि या योजनेतील फायदे ३१ मार्च २०२१. यात भांडवली गुंतवणुक, कर्जाच्या व्याजावर सवलत, जीएसटी, आयकर परतावा, वाहतूक आणि रोजगार यांवर होणाऱ्या विविध खर्चांचा समावेश आहे.
अंदमान आणि निकोबर मलाक्का सामुद्रधुनीच्या अगदी जवळ स्थित आहेत. मलाक्काच्या सामुद्रधुनितून जगातील बराच मोठा व्यापार चालतो.