आता अधिक प्रवासी विमानप्रवास करू शकणार!

आता अधिक प्रवासी विमानप्रवास करू शकणार!

भारतामधील कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना नागरी विमान मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतूकीसाठीची मर्यादा वाढवली आहे. यापूर्वी विमानाच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती वाढवून ६५ टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. याबद्दल नागरी विमान मंत्रालयाने ट्वीट करून माहिती देण्यात आली.

नागरी विमान मंत्रालयाच्या नव्या निर्देशांनुसार ६५ टक्क्यांपर्यंतची परवानगी ५ जुलै पासून देण्यात आली असून, ही परवानगी ३१ जुलै पर्यंत लागू असेल.

हे ही वाचा:

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

भास्कर जाधव यांनी विरोधकांना बोलूच दिले नाही

भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा!

याबाबत नागरी विमान मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी ट्वीट केले होते. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते की देशांतर्गत विमान वाहतूकीसाठी कोविडचे सगळे नियम पाळले जात आहेत. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांत देखील वाढ होत आहे कारण हवाई मार्गाने केलेला प्रवास अधिकाधीक सुरक्षित पर्याय म्हणून उदयास येत आहे. ४ जुलै २०२१ रोजी सुमारे १,४६७ फ्लाईट्समधून १,७४,९०५ प्रवाशांनी प्रवास केला, तर एकूण विमान रहदारी २,९३८ विमानांपर्यंत झाली होती.

मे २०२० मध्ये कोविडमुळे विमान उड्डाणांवर मर्यादा आणल्या होत्या. त्यानंतर प्रथम नागरी विमान मंत्रालयाने विमानातील प्रवासी संख्या ८० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर १ जून रोजी आणली होती. कोविडच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

या बरोबरच मंत्रालयाने तिकिटाची अधिकतम मर्यादेत देखील १४ टक्क्यांनी वाढ केली आहे.

Exit mobile version