जाहिरातींमधून मेट्रो १५ वर्षांत कमावणार १५०० कोटी

मेट्रो प्रवाशांच्या तिकिटांव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून महसूल वाढविणार

जाहिरातींमधून मेट्रो १५ वर्षांत कमावणार १५०० कोटी

एप्रिल महिन्यामध्ये नव्याने सुरू झालेल्या मेट्रो मार्गावरील जाहिरातीच्या माध्यमातून महामुंबई  मेट्रो ऑपरेशन कॉपोरेशन लिमिटेडला (एम एम एम ओ सी एल) चालू वर्षात मेट्रोच्या जाहिरातींमधून तब्बल १०० कोटीचा महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये ‘अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ७’ आणि ‘दहिसर ते डी. एन. नगर २ अ’ या मेट्रो मार्गातील स्थानकाचा समावेश आहे. जाहिरातीच्या माध्यमातून एम एम एम ओ सी एल च्या तिजोरीत आता पर्यंत ७० कोटी रुपये जमा झाले आहेत. मेट्रो प्रवाशांच्या तिकिटांव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून महसूल वाढविण्याचा एमएमएमओसीएलचा विचार आहे.

हे ही वाचा:

झेल सुटले आणि सामनाही निसटला

ठाकरेंच्या घराणेशाहीवर शिंदेंचा बाण

दोन वर्षांच्या मुलाच्या आईने जिंकले सुवर्णपदक

त्यांच्या त्या पंगती, यांचे ते वडापाव

 

एमएमएमओसीएलला जाहिरात व इतर स्त्रोतांकडून पुढील १५ वर्षामध्ये १५०० कोटी महसूल मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच या मेट्रो मार्गावरील मेट्रो स्थानक, मेट्रो ट्रेन व मर्गिकेच्या खांबांवर जाहिरातीचे अधिकार खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसेच या स्थानकांच्या नावाचे अधिकार ही खाजगी कंपनीना देण्यात येणार आहे. त्यामुळे एमएमएमओसीएलला यामधून एक वर्षासाठी १०० कोटी महसूल प्राप्त होणार आहे.

तसेच या मेट्रो मार्गामध्ये येणारे ३० स्थानकातील वरील जागा भाड्याने देणार आहेत. त्यामध्ये मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ  या मार्गिका मधील जागा भाड्याने देण्यात येणार आहे.  तसेच अंधेरी मेट्रो स्थानकातील १७,५०० चौरस फूट जागा ही गाळेधारांकाना भाड्याने देण्यात आली तर मेट्रो स्थानकाचे नावाचे अधिकार आणि मोबाईल टॉवर ही भाड्याने देऊन त्यातून एमएमएमओसीएल उत्पन्न मिळत आहे.

Exit mobile version