‘मारूती’ कंपनी गुजरातमध्ये करणार उत्पादनात वाढ

‘मारूती’ कंपनी गुजरातमध्ये करणार उत्पादनात वाढ

भारतातील लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी मारुती गुजरात मधील उत्पादन वाढविण्याच्या तयारीत आहे. मारुतीचे हरियाणा आणि गुजरात राज्यात कारखाने आहेत. त्यापैकी गुजरात राज्यातील कारखान्याचे उत्पादन अडीच लाखांनी वाढवण्याचा मारुतीचा मानस आहे. 

हरियाणा राज्यात गुरुग्राम आणि मानेसर येथे मारूतीचे कारखाने आहे. या दोन्ही कारखान्यांची क्षमता पंधरा लाख गाड्या निर्माण करण्याची आहे. सुझुकीच्या गुजरात मधील कारखान्यात पाच लाख गाड्यांचे उत्पादन होते. १ एप्रिल २०२१ पासून त्यात अडीच लाखांनी वाढ करून ते साडेसात लाख करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. गुजरात मधील उत्पादन केंद्र हे सुझुकीशी संलग्न आहे. ते बोलेनो आणि स्विफ्ट मॉडेल्सचे उत्पादन होते. इतर मॉडेलचे उत्पादन करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आपल्या उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने, सर्व पुरवठादारांना त्यांचे उत्पादन वाढविण्याच्या सूचना कंपनीने दिलेल्या आहेत.

“आम्ही पुढील वर्षीपासून गुजरात मधील अधिक क्षमतेच्या उत्पादनाचा वापर करण्यास सुरुवात करू. सध्या असलेली मागणी कायम राहिल अशी मला आशा आहे, त्यामुळे आम्ही आमच्या वाढीव क्षमतेचा वापर करून घेऊ शकू, अशी मला आशा आहे.” असे एम.सी.आय.एल अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी सांगितले. 

त्यांच्या मते पुढील वर्षी देखील अशाच प्रकारे वाढती मागणी राहिल. भारताची वाढती अर्थव्यवस्था आणि महामारीतून सावरत असलेले जग यामुळे वाहन उद्योगाला फायदा होईल. मात्र तरीही त्याची तुलना दोन वर्षांपूर्वीच्या मागणीशी होऊच शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version