मारूतीच्या ‘सुपर कॅरी’ ची सुपर विक्री

मारूती सुपर कॅरी हा मिनी-ट्रक असून तो पेट्रोल आणि सी.एन.जी अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. त्यामुळे या लोकप्रिय वाहनाची जबरदस्त विक्री झाली आहे. या महिन्याच्या कालावधीत जबरदस्त विक्री झाली आहे.

मारूतीच्या ‘सुपर कॅरी’ ची सुपर विक्री

‘कोविड-१९’ च्या महामारीतून देश सावरत असताना अर्थव्यवस्थेला सुद्धा उभारी मिळत आहे. डिसेंबर महिन्यात वाहन उद्योगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भारतातीलआघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारूतीचा छोटा ट्रक ‘मारूती कॅरी’ ची घवघवीत विक्री झाली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये एकूण १,६०,२२६ वाहनांची विक्री झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या उलाढालीत वार्षिक २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक वाहन सुपर कॅरी वाहनाच्या विक्रीत देखील जवळजवळ २५९ टक्क्यांची घवघवीत वाढ नोंदवली गेली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये सुपर कॅरीच्या ५,७२६ गाड्यांची विक्री झाली आहे. याउलट डिसेंबर २०१९ मध्ये १,५९१ गाड्यांची विक्री झाली होती. मागील महिन्याच्या तुलनेत ८० टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये ३,१८१ गाड्यांची विक्री झाली होती.

सप्टेंबर २०१६ मध्ये मारूतीने आपला छोटा ट्रक मारूती कॅरी बाजारात आणला होता. तेव्हापासून ७०,००० गाड्यांची विक्री झाली आहे. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात एकूण छोट्या ट्रकच्या विक्रीत सुपर कॅरीचा वाटा १५ टक्के होता. तो वाढून २०२०-२१ मध्ये २० टक्के झाला आहे. हा ट्रक पेट्रोल आणि सी.एन.जी अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. माफक दरात उत्तम सेवा देणारे हे वाहन अल्पावधित लोकप्रिय झाले आहे.

Exit mobile version