25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरअर्थजगतशेअर बाजारातल्याअव्वल १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८२,१६९ कोटी रुपयांनी वाढ

शेअर बाजारातल्याअव्वल १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८२,१६९ कोटी रुपयांनी वाढ

चडीएफसी बँक, एचडीएफसी बँक यांची बाजारभांडवलात सर्वात जास्त वाढीची नोंद

Google News Follow

Related

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८२,१६९. ३ कोटी रुपयांनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी आणि आयटीसी यांच्यासह सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी बाजार मूल्यांकनात वाढ नोंदवली आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी बँक यांनी बाजारभांडवलात सर्वात जास्त बाजार भांडवलाची नोंद केली आहे.

गेल्या आठवड्यात मंगळवारी‘महावीर जयंती’ आणि शुक्रवारीगुड फ्रायडे’निमित्त बाजारपेठेत सुट्टी होती. गेल्या आठवड्यात भांडवल बाजारात झालेल्या जोरदार खरेदीमुळे बीएसईचा सेन्सेक्समध्ये ८४१.४५ अंकांनी जोरदार वाढ झाली होती. भांडवल बाजारातही अव्वल कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल आढावा सप्ताहात ३१,५५३.४५ कोटी रुपयांनी वाढून ९,२९, ७५२.५४ कोटी रुपयांवर पोहोचले. एचडीएफसीचे बाजारमूल्य १८,८७७. ५५ कोटी रुपयांनी वाढून ५,००,८७८. ६७ कोटी रूपांवर गेले आहे. भारती एअरटेलचे बाजार भांडवल ९,५३३.४८ कोटी रुपयांनी वाढून ४,२७,१११.०७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ६,७३१.७६ कोटी रुपयांनी वाढून १५,८३,८२४. ४२ कोटी रुपये आणि टीसीएसचे बाजार भांडवल ५,८१७.८९ कोटी रुपयांनी वाढून ११,७८,८३६. ५८ कोटी रुपये झाले. आयटीसी चे बाजारमूल्य ४,७२२.६५ कोटी रुपयांनी वाढून ४,८१,२७४.९९ कोटी रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया चे बाजारमूल्य ३,७९२.९६कोटी रुपयांनी वाढून ४,७१,१७४.८९ कोटी रुपयांवर गेले आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल १,१३९.५६ कोटी रुपयांनी वाढून ६,०२,३४१.२२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. परंतु इन्फोसिसचे बाजार २,३२३.२ कोटी रुपयांनी घसरून ५,८९,९६६.७२ कोटी रुपये झाले.

हे ही वाचा:

“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”

हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो

अजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच मत

दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

आयसीआयसीआय बँकेचे भांडवल १,७८०.६२कोटी रुपयांनी घसरून६,१०,७५१.९८कोटी रुपये झाले. अव्वल १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचडीएफसी, आयटीसी, एसबीआय आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा