‘मराठावाडा रेल कोच फॅक्टरी’चे उत्पादन

‘मराठावाडा रेल कोच फॅक्टरी’चे उत्पादन

केविड-१९च्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर २०२० रोजी लातूरच्या मराठवाडा रेल कोच फॅक्टरीतून प्रथम डब्याचे उत्पादन करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी या कारखान्याचे उद्घाटन झाले होते. एकूण भारतीय रेल्वेच्या डब्यांच्या गरजांचा मोठा भार हा कारखाना उचलेल अशी अपेक्षा आहे. हा कारखाना महाराष्ट्राच्या प्रादेशिक विकासासाठीसुध्दा फायद्याचा ठरेल.

सुरूवातीच्या काळात या कारखान्यातून सर्व तऱ्हेच्या २५० डब्यांचे उत्पादन वर्षाला होईल. या कारखान्यातून एम.इ.एम.यु/इ.एम.यु/एल.बी.एच या सर्व तऱ्हेच्या डब्यांचे उत्पादन होईल.

एकूण ३५० एकर परिसरात पसरलेल्या कारखान्याच्या पसाऱ्यात ५२,०००चौ.मी. लांबीची इंजिनीयरींग शेड, तीन लाईनचे यार्ड, ३३ किलोवॅटचे विद्युत सबस्टेशन, उपाहारगृह आणि निवसी संकुलाखेरीज इतर आवश्यक सुविधांचा समावेश होतो. हरणगुल स्थानकापर्यंत डब्यांच्या हालचालीसाठी विद्युत मार्गिकेची जोडणी देण्यात आली आहे. हा कारखाना उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने युक्त आहे.

कारखान्याच्या छतावर ८०० किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. कारखान्याला अधिक पर्यावरणप्रेमी बनवण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रेन वॉटर हार्वेस्टींग प्रणाली, कारखान्याच्या परिसरात १००० झाडे लावण्यात आली आहेत. त्याबरोबरच एल.ई.डी दिवे लावण्यात आले आहेत. कारखाना उभारताना नैसर्गिक सुर्यप्रकाश व खेळती हवा याचा विचार करण्यात आला आहे.

कारख्यान्याच्या उभारणीला मंजुरी मिळाल्यानंतर अल्पकाळातच उभारणीला सुरूवात झाली होती. नजिकच्या भविष्यात कारख्यानातून संपूर्ण रेल्वे बांधणी होऊ शकेल अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version