25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल

पहिल्या तिमाहीत राज्यात ३६ हजार ६३४ कोटींची गुंतवणूक

Google News Follow

Related

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात ३६ हजार ६३४ कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआय आल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे चांगली परकीय गुंतवणूक आणून राज्याने थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल स्थान पटकावले आहे. राज्याला गेल्या वर्षी एफडीआयमध्ये १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपये मिळाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण बनले आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

२०२२- २३ या आर्थिक वर्षात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र २०२३- २४ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ३६ हजार ६३४ कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे.

“गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती असून राज्याला २०१९ पर्यंत पहिल्या स्थानावर ठेवले होते. पण, ठाकरे सरकार आल्याने महाराष्ट्र यादीतून बराच खाली जाऊन गुजरात पहिला क्रमांकावर गेले होते. मागील एका वर्षात महाराष्ट्रला गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं आता तिमाही रिझल्ट आले आहे,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात आता हिजाब व्यवस्थित न घातल्यास महिलांना उद्यानबंदी

‘इंडिया’ गटाला धक्का? ‘आप’ बिहार विधानसभा निवडणूक लढवणार

चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानात बहरणार ‘नागरी वन’

फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका खपवून घेणार नाही

एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत महाराष्ट्रात ३६ हजार ६३४ कोटींची परदेशी गुंतवणूक आली आली आहे. देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा २९ टक्के आहे. २०२२- २३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार कोटींची गुंतवणूक आली. देशात गुंतवणुकीत राज्याचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक, गुजरात, दिल्ली, तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा