30 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरअर्थजगतथेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; सहा महिन्यात वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; सहा महिन्यात वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

राज्यातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत असताना आता फडणवीस सरकारने थेट आकडेवारी जाहीर करत विरोधकांची बोलती बंद केली आहे. राज्यातील परदेशी गुंतवणुकीची यादी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असल्यचे म्हटले आहे. सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के जमा झाली आहे. अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के एफडीआय अवघ्या ६ महिन्यांत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परकीय गुंतवणूक आणण्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र नेहमीच पुढे राहिला आहे. आताही २०२४-२५ या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या चार वर्षातील वार्षिक गुंतवणुकीची सरासरी पाहता चालू आर्थिक वर्षातील सहा महिन्यातच महाराष्ट्राने एकूण ९४.७१ टक्के गुंतवणूक आकर्षित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत दिली आहे.

गेल्या चार वर्षांतील सरासरी पाहिली तर दरवर्षी १ लाख १९ हजार ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. यंदा सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त सहा महिन्यात आली आहे. याबद्दल मी महाराष्ट्राचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

कर्नाटकात बस भाडेवाढ, आता पत्नीसाठी बस मोफत, पतीला दुप्पट भाडे!

रेल्वे रुळावर पडला होता लोखंडी दरवाजा; रेल्वे उलटवण्याचा होता कट!

सपा खासदार बर्क यांना दणका; एफआयआर रद्द होणार नाही

फिलिपाईन्स, व्हिएतनामनंतर इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार ‘ब्राह्मोस’!

आकडेवारीनुसार, सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून कर्नाटक दुसऱ्या, गुजरात तिसऱ्या, दिल्ली चौथ्या आणि तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा