परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा वर्चस्व दाखवत पहिला क्रमांक पटकावला आहे. परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकवर आला आहे. यानंतर जी लोकं उद्योग बाहेर राज्यात गेल्याची टीका करत होते त्यांनी आतातरी आपली तोंडे बंद केली पाहिजेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेन्टच्या (एफडीआय) आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर होता. तर, २०२१- २२ मध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर होते. त्यानंतर आता महाराष्ट्राने मुसंडी मारून पहिला क्रमांक पटकावला आहे.
आमचे सरकार आल्यापासून पुन्हा तीन वर्षांनी महाराष्ट्र राज्य परदेशी गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आले आहे. ते आता आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपली तोंडे बंद ठेवावीत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे ही वाचा:
‘बिपरजॉय’मुळे पावसाची आणखी प्रतीक्षा
गोव्यात भरणार वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव
तेज प्रताप यादवांचा अजब तर्क, म्हणे बिहारमधील पूल कोसळायला भाजपा जबाबदार
लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेचे सडेतोड उत्तर
मुंबई येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी गुंतवणुकीबाबत माहिती दिली. राज्य सरकारने अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात दोन बड्या कंपन्यांसोबत एक मोठा करार केला आहे. फडणवीसांनी गुंतवणूक कराराबद्दल माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रोजेक्टच्या (PSP) संदर्भात १३ हजार ५०० मेगावॅटचे करार केंद्र सरकारची एनएचपीसी आणि खाजगी क्षेत्रातील टॉरेंट पावर या दोन कंपन्यांशी केले आहेत. तसेच यातून जवळपास ७१ हजार कोटींची गुंतवणुक होणार आहे. तर ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे.