जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक २२,१२९ कोटी रुपये इतका राहिला असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. बिहार वगळता बहुतांश राज्यांमध्ये जीएसटी संकलनात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात जीएसएस संकलन लागोपाठ पाचव्यांदा १.४० लाख रुपयांच्यावर रहिले आहे. जुलैमध्ये जीएसटी संकलन २८ टक्क्यांनी वाढून ते १,४८,९९५ कोटी रुपयांवर गेले. या आधी याच वर्षात फक्त एप्रिलमध्ये सर्वात जास्त १.६८ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.

जीएसटी परिषदेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे जीएसटी संकलनात जुलैमध्ये जोरदार वाढ झालेली असून देशातील आर्थिक सुधारणांचा सकारात्मक परिणाम यावर झालेला असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले

माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं

कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?

एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम

एप्रिल २०२२ मध्ये पहिल्यांदाच जीएसटी संकलन १.५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. एप्रिलमध्ये एकूण महसूल १,६७,५४० कोटी रुपये नोंदवला गेला. यामध्ये सीजीएसटी ३३,१५९ कोटी रुपये, एसजीएसटी ४१,७९३ कोटी रुपये, आयजीएसटी ८१,९३९ कोटी रुपये आणि सेस १०,६४९ कोटी रुपये होता.

जीएसटी संकलन वाढण्याची शक्यता

जीएसटी कौन्सिलच्या जून महिन्यात झालेल्या बैठकीत काही गोष्टींवर जीएसटी वाढवून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीच्या दरात वाढ झाल्यामुळे येत्या काही दिवसांत जीएसटी संकलनात वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन दर १८ जुलैपासून लागू झाले आहेत.

असे आहे विविध राज्यांचे जीएसटी संकलन
राज्य           संकलन      वाढ
गुजरात        ९,१८३      २०%
महाराष्ट्र        २२,१२९    १७%
राजस्थान       ३,६७१     १७%
पंजाब          १,७३३     १३%
मध्य प्रदेश     २,९६६     १२%
छत्तीसगड      २,६९५     ११%
(जीएसटी आकडेवारी कोटी रुपयांत)

Exit mobile version