हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. समृद्धी महामार्गाचं ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातल्या शक्ती पीठांसाठी देखील महत्वाची घोषणा केली आहे. नागपूर ते गोवा दरम्यान पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ हा ८६० किमीचा महामार्ग उभारण्यात येणार आहे . यासाठी ८६,३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असे फडणवीस म्हणाले.
सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता करण्यात येणार आहे. त्याच्याच जोडीला माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार आहेत. या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ होणार आहेत .
हे ही वाचा:
स्मारके उजळणार, तीर्थक्षेत्र बहरणार
महाराष्ट्राचे वाळवंट होऊ नये म्हणून नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेतीचा पुरस्कार
अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण आले समोर…
१०० वर्षे जुन्या मुंबईच्या प्रवेशद्वाराला ‘तडे’
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करनयेत येणार आहे. त्याच्याच जोडीला ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार करण्यात येणार आहे. वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून देन्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
जनारोग्य योजनेत ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण सध्याच्या १. ५० लाखांच्या तुलनेत आता ५ लाख करण्यात आले आहे. त्यामुळे आता ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहे. नवीन २००रुग्णालयांचा यात समावेश करण्यात येणार आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लाभ रक्कम सध्याच्या अडीच लाख रुपत्यांवरून आता चार करण्यात आली आहे. राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उघडण्यात येणार आहेत.