नुकत्याच झालेल्या महिला दिनाचा संदर्भ घेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात महिला वर्गावर घोषणांचा पाऊस पडला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याचे चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने तो पंचामृत ध्येयांवर आधारित आहे.
या पाच पंचामृतांच्या दुसऱ्या पंचामृतमध्ये महिलांच्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा फडणवीस यांनी केल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या ओवीचा संदर्भ देत जन्माला येणाऱ्या मुलीसाठी महत्वाची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवी घोषणा जाहीर केली .
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक असलेल्या कुटुंबात मुलगी जन्मला आल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल. राज्य सरकार मुलीचा जन्म झाल्यावर तिच्या नावावर पाच हजार रुपये देणार आहे. तर चौथीत गेल्यानंतर चार हजार रुपये, सहावीत सहा हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थी मुलीचे वय अठरा झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये तिला रोख देण्यात येईल असे फडणवीस म्हणाले. अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांना न्याय देताना अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपयांवर नेण्याचे जाहीर करतानाच अर्थमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर, मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना, महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
स्मारके उजळणार, तीर्थक्षेत्र बहरणार
अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण आले समोर…
महाराष्ट्राचे वाळवंट होऊ नये म्हणून नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेतीचा पुरस्कार
बससेवेत तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर जाहीर करण्यात आले आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार केला जाणार आहे. त्याच प्रमाणे राज्यात पाच लाखांपर्यंतचे उपचार महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत मोफत केले जाणार आहे.
महिलांसाठी मुद्रांक शुल्कावर १% सवलत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मुद्रांक शुल्कावर १ % सवलत जाहीर केली. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील महिलांसाठी घरखरेदी स्वस्त होईल अशी अपेक्षा आहे. रिअल इस्टेट तज्ज्ञांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये घरमालकीची भावना निर्माण होईल आणि त्यांना मालमत्तांच्या नोंदणीवर खर्च होणारा पैसाही वाचवता येईल.
नोकरदार महिलांसाठी ‘शक्तीसदन’ नवी योजना
नोकरदार महिलांसाठी ‘शक्तीसदन’ ही नवी योजना जाहीर केली आहे. दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येणार आहे. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतीगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे