एन्रॉन प्रकल्प पुन्हा सुरु होण्याचे संकेत

राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठपुरावा

एन्रॉन प्रकल्प पुन्हा सुरु होण्याचे संकेत

एन्रॉन प्रकल्प पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्यातील शिंदे भाजप सरकार कडून हा प्रकल्प सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. युती सरकारच्या काळात १९९५ मध्ये हा प्रकल्प कोकणात रत्नागिरीमध्ये उभारण्यात येणार होता. तत्कालीन सरकारच्या काळात या प्रकल्पातील भ्रष्टाचार, वाद आणि राजकारण यामुळे हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. परंतु राज्यत झालेल्या सत्तांतरानंतर हा प्रकल्प पुन्हा एकदा नावारूपाला येण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

अमेरिकन ऊर्जा कंपनी एन्रॉनने महाराष्ट्रातील दाभोळ येथे गॅसवर चालणारा वीज प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया १९९२ मध्ये, सुरू केली होती. उदारीकरण सुरू झाल्यानंतर भारतात गुंतवणूक करणारी एन्रॉन ही पहिली मोठी बहुराष्ट्रीय कंपनी होती. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाबरोबर (एमएसईबी) १९९३ मध्ये वीज खरेदी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिकी कंपनी एन्रॉन आणि त्यांची सहयोगी कंपनी दाभोळ पॉवर कॉर्पोरेशनने १९९६ मध्ये महाराष्ट्रात तीन अब्ज मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प स्थापन केले होते. भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांनी या प्रकल्पाच्या कामावर लवकरच पडदा पडला.

१९९५ मध्ये महाराष्ट्रात युतीचे नवीन सरकार आले आणि समितीच्या सूचनांवरून हा प्रकल्प थांबवण्यात आला. युती सरकारच्या काळातील या वादग्रस्त ठरलेल्या प्रकल्पाला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. त्यादृष्टीने शिंदे – भाजप सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. ही रिफायनरी केरळला जाणार असल्याचं बोललं जात असलं तरी आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. नाणार नंतर आता एन्रॉन प्रकल्पाची चर्चाही आता सुरु झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एक दोन्ही प्रकल्पाबाबत पुढे काय पावले पडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.

Exit mobile version