सध्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा होत आहे कारण घटती कमाई, कथित समृद्ध मूल्यमापन आणि तंत्रज्ञान समभागांमध्ये मोठी घसरण यामुळे जागतिक स्तरावर दलाल स्ट्रीटवर काही नवीन-युग कंपन्यांचे समभाग खाली आले आहेत.
यामध्ये वन97 कम्युनिकेशन्स (पेटीएम), एफएसएन ई-कॉमर्स (नायका), झोमॅटो आणि पीबी फिनटेक (पॉलिसीबाझार) या चार कंपन्या, ज्यांनी त्यांच्या सूचीच्या पहिल्या दिवशी बाजार मूल्यात ३.५८ लाख कोटी रुपये कमावले होते. आता त्यांच्या गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे १.३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पेटीएमने १८ नोव्हेंबरला पहिल्या दिवशीच्या बंद एम-कॅप मध्ये जवळपास एक लाख कोटींवरून थेट ५५ हजार ८०२ कोटींची घसरण पाहायला मिळाली आहे. पेटीएमच्या IPO च्या इश्यू किमतीच्या मूल्याच्या दोन तृतीयांश मूल्य पेटीएम गुंतवणूक दारांनी गमावले आहेत.
हे ही वाचा:
अवघ्या सोळाव्या वर्षी गुजरातच्या बॅडमिंटनपटू तस्मिनने रचला इतिहास
३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’
संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
नवाब मलिक लावणार चांदीवाल आयोगासमोर हजेरी
तर नायकाने एक लाख कोटींवरून थेट ३३ हजार ५२ कोटी रुपयांच्या बाजारमूल्यात घट नोंदवली आहे. तसेच झोमॅटोच्या गुंतवणूकदारांना ३१ हजार ८५९ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. दुसरीकडे, पॉलिसीबाझारच्या गुंतवणूकदारांचा १९ हजार २०० कोटींचे नुकसान झाले आहे. पॉलिसीबाझारचे १५ नोव्हेंबर २०२१ रोजी या समभागाचे बाजार भांडवल ५४ हजार ७० कोटी रुपये होते जे ३४ हजार ८६९ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.
दरम्यान भारतीय इक्विटी मार्केट्ने आज अत्यंत अस्थिर होते. सेन्सेक्स १०४ अंकांनी घसरून ५७ हजार ८९२ वर बंद झाला, तर निफ्टी50, १७.६० अंकांनी घसरून १७ हजार ३०४ वर स्थिरावला आहे.