मोबाईल असो की इलेकट्रीक वाहन असो वा सोलर पॅनेल यामध्ये लिथियम धातू हा महत्वाचा घटक असतो . त्यामुळे लिथियम आयन बॅटरीचे नाव ऐकले नसेल असा क्वचितच कोणी असेल. सध्या भारत आपल्या गरजेनुसार लिथियम आयात करतो. त्यामुळेच मोबाईल आणि इ-वाहनांच्या किमती अजूनही जास्त आहेत. पण आता एक आनंदाची बातमी आहे देशातील विविध मौल्यवान धातूंचे साठे शोधण्याच्या भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या सततच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. या संस्थेला जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात लिथियमचे मोठे साठे आढळून आले आहेत. देशातील हा पहिला लिथियमचा साठा असल्याचे म्हटल्या जात आहे.
बॅटरीची वाढती गरज आणि त्यात लिथियमचा वापर लक्षात घेता, हा साठा देशासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रियासी जिल्ह्यात ५.९ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला असल्याचा अंदाज आहे. केंद्रीय भूगर्भीय कार्यक्रम मंडळाच्या ६२ व्या बैठकीत खाण सचिव विवेक भारद्वाज यांनी देशात जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लिथियमचा साठा सापडला आहे असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु
पीएफआयला २०४७ पर्यंत भारतात स्थापन करायचे होते इस्लामिक राज्य
उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले
राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत
तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन सरकार महत्त्वाच्या धातूंच्या पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना येथेही खाणी घेतल्या जात आहेत. सध्या भारत लिथियम, निकेल आणि कोबाल्ट यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांसाठी आयातीवर अवलंबून आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशातील महत्त्वाच्या खनिजांचा साठा शोधून त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी सोन्याची आयात कमी करण्याची गरजही असल्याचे यांनी सांगितले .
म्हणून लिथियम बॅटरी महत्वाची
लिथियम-आयन बॅटरीची क्षमता जास्त असते आणि इतर रासायनिक प्रकिया आधारित बॅटरीच्या तुलनेत त्यांचे जास्त आयुष्य असते. लिथियम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची श्रेणी वाढविण्यात मदत झाली आहे आणि एका चार्जमध्ये ५०० ते ७००किलोमीटर धावणाऱ्या कारचे उत्पादन केले जात आहे. लिथियम-आयन बॅटरीमुळे मोबाईल फोन एका चार्जवर अनेक दिवस का करू शकतात .