तुम्ही आधारकार्ड पॅनशी लिंक केले आहे का ?

आधार कार्डशी संलग्न नसलेली कार्ड एक एप्रिल २०२३ पासून रद्द करण्यात येणार

तुम्ही आधारकार्ड पॅनशी लिंक केले आहे का ?

ज्या नागरिकांनी आपले आधार कार्ड पॅनकार्डशी संलग्न केले नाही त्यांनी त्वरित आपले कार्ड लिंक करावे, अन्यथा आपले कार्ड निष्क्रिय करण्यात येईल असे केंद्र शासनाने जाहीर केले आहे.

याबाबतीत विस्तृत माहिती अशी की, पॅन आधार जोडणी करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याचे अधिकृत निर्देश शनिवारी प्राप्तिकर विभागाने प्रसारित केले. आधार कार्डशी संलग्न नसलेली कार्ड एक एप्रिल २०२३ पासून रद्द करण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. जे अनिवार्य आहे, अत्यावश्यक आहे त्यास विलंब करू नका.

प्राप्तिकर कायदा १९६१ नुसार पॅनधारकांनी आपली आधार कार्ड पॅनशी संलग्न करणे अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे यासाठी ३१ मार्च २०२३ हि मुदत देण्यात आली आहे. आपण जर संलग्न न केल्यास ती पॅन कार्ड निष्क्रिय केली जातील. असा इशाराही या संदर्भात देण्यात आला आहे. मात्र यात आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय येथील रहिवासी तसेच प्राप्तिकर कायद्यानुसार अनिवासी भारतीय जे ८० वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांना यामधून वगळण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

यासंबंधित असलेले परिपत्रक केंद्रीय वित्त मंत्रालयाने मे २०१७ मध्येच प्रसिद्ध केले आहे. जर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर काय परिणाम होईल? जर का पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर संबंधित करदात्याला आपले प्राप्तिकर विवरण पत्र सादर करता येणार नाही तसेच कर परताव्याचा दावाही करता येणार नाही. शिवाय जिथे केवायसी अनिवार्य आहे जसे बँक,बाजारहाट,दुकाने इ. अशा ठिकाणी व्यवहारावर अर्थातच परिणाम होईल तो परिणाम टाळता यावा यासाठी आवश्यक पावले उचलावी.

Exit mobile version