एलआयसी आयपीओची विक्री या तारखेला होणार

एलआयसी आयपीओची विक्री या तारखेला होणार

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्रारंभिक सार्वजनिक समभाग (आयपीओ) संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एलआयसीच्या आयपीओची विक्री मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. एलआयसीची आयपीओ विक्री ४ मे रोजी खुली होईल आणि ९ मे रोजी बंद होईल, अशी माहिती समोर आली आहे.

एलआयसीची ५ टक्के हिस्साविक्री करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आयपीओसाठी अर्ज केला होता. मात्र, आता प्रत्यक्षात ३.५ टक्के हिस्साविक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीओमधून भांडवल उभारणीचे लक्ष्य घटून २१ हजार कोटी रुपयांचे झाले आहे. ही भांडवल उभारणी करण्यासाठी एलआयसी सुमारे २२ हजार कोटी शेअर्स विक्रीला आणणार आहे.

शेअर्सची इश्यू किंमत ९५० रुपये ते एक हजार रुपये असेल. तर एलआयसी आयपीओच्या एका लॉटमध्ये १५ शेअर्स असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

भारताविरोधी प्रसार करणारे १६ युट्यूब चॅनल्स ब्लॉक

एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक!

राणांच्या घरात घुसू पाहणाऱ्या शिवसैनिकांना एका दिवसात जामीन

फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती

एलआयसीच्या आयपीओद्वारे भांडवल उभारणीचे लक्ष्य सरकारने घटवले असले तरीही हा आजवरचा सर्वांत मोठा आयपीओ ठरणार आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार एलआयसी ही ६६ वर्षे जुनी विमा कंपनी असून त्यांच्याकडे २८  कोटींहून अधिक पॉलिसी आहेत. ही जगातील पाचव्या सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे.

Exit mobile version