एलआयसीने घेतले अदानी कंपनीत आणखी शेअर्स, काँग्रेसचा तीळपापड

या तिमाहीत अदानी उद्योगसमुहाच्या तीन कंपन्यांमध्ये वाढला टक्का

एलआयसीने घेतले अदानी कंपनीत आणखी शेअर्स, काँग्रेसचा तीळपापड

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून सध्या देशभरात काँग्रेसने आंदोलने केली आहेत. भारतीय आयुर्विमा अर्थात एलआयसीचे किती पैसे अदानी समुहात आहेत, याविषयी सातत्याने सवाल उपस्थित केले जात आहेत. पण आता एलआयसीने अदानी उद्योगसमुहात आणखी शेअर्स विकत घेतले आहेत.

एलआयसीने या तिमाहीत अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस या तीन कंपन्यांमध्ये शेअर्स घेतले आहेत. मात्र एलआयसीने हे शेअर्स विकत घेतल्यानंतर काँग्रेसचा तीळपापड झाला आहे. एलआयसीला जबरदस्तीने शेअर्स विकत घ्यायला सांगितले जात असून त्यामुळेच संयुक्त संसदीय समितीची मागणी आवश्यक ठरते, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला आहे.

अदानी ट्रान्समिशनमध्ये एलआयसीने ३.६५ टक्क्यावरून ३.६८ टक्के इतके शेअर्स वाढविले आहेत तर अदानी ग्रीनमध्ये हे शेअर्स १.२८ वरून १.३५ इतके वाढले आहेत तर अदानी टोटल गॅसमध्ये ५.९६ वरून ६.०२ इतका शेअर्सचा टक्का वाढला आहे. पण त्याचवेळी अदानी पोर्ट्समधील एलआयसीची शेअर्सची टक्केवारी ९.१४ वरून ९.१२ झाली आहे तर अंबुजा सीमेंट्समधील शेअर्स ६.३३ वरून ६.२९ टक्क्यांवर आली आहे. एसीसीमध्ये ६.४१ टक्के इतके शेअर्स होते ते आता ५.१३ इतके आहेत.

हे ही वाचा:

” मन की बात”साठी १०० नंबरी संकल्पना सुचवा आणि बक्षीस जिंका

बँक घोटाळाप्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात अजित पवार, सुनेत्रा पवारांचे नाव नाही!

म्यानमारच्या नागरिकांवर लष्कराचा सतत २० मिनिटे गोळीबार, बॉम्बहल्ला

सचिन वाझेला मुकेश अंबानी आणि कुटुंबाबद्दल वाटतो आदर

यावरून काँग्रेसला संताप आला आहे. अदानी एंटरप्रायझेसमध्ये एलआयसीची गुंतवणूक १.३२ टक्के इतकी होती ती आता ४.३२ टक्के झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत एलआयसीने अदानी उद्योगसमुहात ३.७५ लाख शेअर्स विकत घेतले आहेत.

अदानी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करा आणि चौकशी होऊ द्या, अशी मागणी काँग्रेसतर्फे केली जात आहे. त्यांनी या मागणीवरून सातत्याने संसदेत काम होऊ दिलेले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अशा संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नसल्याची भावना व्यक्त केली होती. त्यामुळे शरद पवार यांना टीका सहन करावी लागली होती.

Exit mobile version