फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

१० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते.

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

ट्विटरनंतर, प्रमुख सोशल मीडिया साइट्स फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवरही ९ नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होणार आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग यांनीही याला मान्यता दिली आहे.

काही चुकीच्या निर्णयांमुळे कंपनीची ही अवस्था झाली आहे, यासाठी आपण स्वतः जबाबदार आहे असे झुकेरबर्ग यांनी एका बैठकीत बोलताना सांगितले . कंपनीच्या कर्मचार्‍यांशी झालेल्या संभाषणात त्यांनी मेटामध्ये सुरू असलेल्या कर्मचारी कपातीची पुष्टी केली आहे. मेटामध्ये सध्या सुमारे ८७,००० कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी सुमारे १० टक्के कर्मचारी कामावरून काढले जाण्याची शक्यता आहे. कंपनी ज्या कर्मचाऱ्यांची छाटणी करेल, त्यांना किमान चार महिन्यांचा पगार मिळेल.

हे ही वाचा:

लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण?

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली नव्या सरन्यायाधीश पदाची शपथ

‘खोक्या’बद्दल लवकरच सुप्रिया सुळेंना नोटीस देण्याची तयारी

दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

फेसबुकची स्थापना २००४ मध्ये झाली. फेसबुकच्या बाजार भांडवलामध्ये यावर्षी ५९९ अब्ज डॉलरने घट झाली आहे. झुकेरबर्ग मेटा प्लॅटफॉर्म्स इंक ची सुमारे १६.८ टक्के मालकी आहे. कंपनीचे शेअर्स घसरल्याने झुकरबर्गची एकूण संपत्ती या वर्षी ८८. २ अब्ज डॉलरने घसरून ३७. २ अब्ज डॉलर झाली आहे. झुकेरबर्ग एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर होते , मात्र आता तो २८ व्या क्रमांकावर घसरले आहेत .

Exit mobile version