भारताच्या महानायकाला मानवंदना

रतन टाटा यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

भारताच्या महानायकाला मानवंदना

उद्योग, सामाजिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्रात एक उत्तुंग भरारी घेणारा सच्चा देशभक्त रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळी येथील स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार केले गेले. पोलिसांना त्यांना मानवंदना दिली.

रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतातच नव्हे तर जगभरात हळहळ व्यक्त केली गेली. त्यांनी उद्योगक्षेत्राला दिलेल्या योगदानाची आठवण त्यांच्या निधनामुळे ताजी झाली आणि एका महान देशभक्ताला देश मुकल्याची भावना प्रत्येकाची तोंडी होती.

त्यांचे पार्थिव सकाळी १० वाजता मुंबईतील एनसीपीए येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राजकारण, उद्योग, सामाजिक क्षेत्र, मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उबाठाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. दुपारी ४ वाजता टाटा यांचे पार्थिव वरळी येथील स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे पारसी रीतिरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे ही वाचा:

रतन टाटांचा एक अनोखा पैलू, ‘मोठी स्वप्ने पाहणे आणि इतरांना काहीतरी देण्याची आवड’

भाजपाचा विजय उबाठाचे ढोलताशे… |

रतन टाटांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रात शोककळा; भारतासाठी दुःखद दिवस असल्याच्या भावना

हिंदू तरुणीने छेड काढणाऱ्या शोएब, इम्रान, सलमानला भररस्त्यात दिला चोप!

सर्वसामान्यांकडूनही टाटा यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. टाटा यांची रविवारी प्रकृती बिघडली होती. त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे जाहीर करण्यात आले. पण बुधवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले. त्याच दिवशी रात्री उशिरा त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. ते ८६ वर्षांचे होते. देशभरातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी टाटांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण केली.

Exit mobile version