महाराष्ट्रामध्ये कोविडमुळे गेले वर्षभर शाळा ऑनलाईन चालू आहेत. मात्र त्यामुळे लॅपटॉप आणि फोनच्या दुकानांमध्ये गर्दी पहायला मिळत आहे. शैक्षणिक उपयोगासाठी, वर्गात उपस्थित राहण्यासाठी या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचाच आधार असल्याने ही उपकरणे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे.
महाराष्ट्रातील अनेक शाळा ऑनलाईन वर्ग घेत आहेत. त्यामुळे पूर्वी जिथे वह्या, पुस्तकांची खरेदी, त्यांच्यासाठी कव्हर खरेदी अशा प्रकारांतून शाळांची तयारी होत असे. सध्या विद्यार्ध्यांना हे नवे यंत्र हाताळावे लागत असल्याने विद्यार्थ्यांसाठी या पालक मोबाईल, लॅपटॉप खरेदी करत आहेत. त्याबरोबरच जुनी उपकरणे खरेदी करण्याकडे देखील काही पालकांचा कल असल्याचे दिसून आले आहे.
या ग्राहकांमध्ये दोन वर्ग आढळून आले असल्याचे काही व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. एक वर्ग महागातील यंत्रे खरेदी करताना दिसून येत आहे. यामध्ये उत्तमोत्तम लॅपटॉप, मोबाईल यांच्या सोबतच काह पालकांकडून कमी किमतीच्या परंतु अधिकाधीक सक्षम फोनला मागणी असल्याचे देखील आढळून आले आहे.
हे ही वाचा:
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप: पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारत ६९/२
फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांचा क्वॉरंटाईन
ठाकरे सरकार संविधानिक हक्कांवर गदा आणत गळा घोटण्याचं काम करतंय
शिवसेना आमदाराचा फुकट पेट्रोल भरण्याचा भिकारीपणा
ग्राहकांकडून अशा प्रकारची मागणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन, पूर्वतयारी केली होती. त्यानुसार ग्राहकांनी देखील प्रतिसाद दिल्यामुळे दिलासा मिळत असल्याचे देखील एका दुकानदाराकडून सांगण्यात आले.
कोविडमुळे एकूण शिक्षण व्यवस्था डळमळीत झाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनांचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. त्याबरोबरच अकरावीच्या प्रवेशांचा देखील प्रश्न कोविडमुळे उपस्थित झाला आहे.