27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरअर्थजगतअयोध्येत जमिनींना चढला भाव; किंमती चारपट वाढल्या

अयोध्येत जमिनींना चढला भाव; किंमती चारपट वाढल्या

कंपनींच्या शेअर्स किंमतींमध्येही वाढ होणार

Google News Follow

Related

अयोध्या राम मंदिरात लवकरच भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ जानेवारीला या भव्य मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीचा फायदा उत्तर प्रदेश आणि अयोध्येवर झाला आहे. येथे सर्व प्रकारच्या व्यवसायांची भरभराट होताना दिसत असून शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रही भरभराटीला येताना दिसत आहे. अयोध्येतील मालमत्तेच्या किमती उत्तर प्रदेशातील इतर शहरांच्या तुलनेत खूप वेगाने वाढल्या आहेत. येथील जमिनींचे भाव जवळपास चौपट वाढले आहेत.

अयोध्येत राम मंदिरासोबत नवीन रेल्वे स्थानक आणि विमानतळ तयार झाले आहे. लोकांच्या सेवेतही आले आहे. शिवाय अनेक विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे शहरात रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी अनेक पटींनी वाढली आहे. प्रॉपर्टी मार्केट तज्ज्ञांच्या मते रिअल इस्टेट क्षेत्रातील ही तेजी आता थांबणार नाही. अयोध्येतील लोकांना केवळ स्थानिक लोकांकडूनच नाही तर बाहेरील लोकांकडूनही मालमत्ता खरेदी करण्याच्या ऑफर येत आहेत. राम मंदिरामुळं अनेक मोठमोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही शहरात आली आहेत. यामध्ये ताज आणि रॅडिसनसारख्या मोठ्या हॉटेल चेनचाही समावेश आहे. या मोठ्या खरेदीदारांमुळेच मालमत्तेच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे.

राम मंदिरासोबतच सरकार अयोध्येत अनेक मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करत आहे. अयोध्येला धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राम मंदिराच्या उभारणीचे जगभर आकर्षण आहे. यामुळे गुंतवणूकदार एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून याकडे पाहत आहेत. राम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळेच पायाभूत सुविधांपासून ते हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी क्षेत्रापर्यंतच्या कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.

हे ही वाचा:

निवडणुकीपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार, मतदान केंद्राला लावली आग!

मार्कोस कमांडोनी जहाज घेतले ताब्यात; वाचवले भारतीयांचे प्राण!

हॉलिवूड अभिनेत्याचे विमान समुद्रात कोसळले; मुलींनीही जीव गमावला!

बंगाल रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्येंना अटक!

अहवालानुसार, २०१९ मध्ये ज्या भागात जमिनीचा भाव १००० ते २००० रुपये प्रति चौरस फूट होता, तिथे आता जमीन ४००० ते ६००० रुपये प्रति चौरस फूट दराने उपलब्ध आहे. शहराच्या सीमेवर असलेल्या फैजाबाद रोडवर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. २०१९ मध्ये येथील जमिनीचा भाव ४०० ते ७०० रुपये प्रति चौरस फूट होता, तो आता १,५०० ते ३००० रुपये प्रति चौरस फूट झाला आहे. रेल्वे स्थानक आणि विमानतळाजवळील भागातही किंमतीत मोठी वाढ झाली आहे. अभिनंदन लोढा यांनी जानेवारीतच अयोध्येत २५ एकरावर निवासी योजना सुरू केली आहे.

कंपनींच्या शेअर्स किंमतींमध्येही वाढ होणार

अयोध्येत राम मंदिर उघडल्यानंतर काही कंपनींच्या शेअर्स किंमतींमध्येही झपाट्याने वाढ होणार आहे. यात अपोलो सिंदूरी या भारतातील एक प्रमुख हॉस्पिटॅलिटी सेवा व्यवस्थापन आणि समर्थन सेवा देणाऱ्या कंपनीचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. ही कंपनी हेल्थकेअर केटरिंग, इंडस्ट्रियल केटरिंग, कॉर्पोरेट केटरिंग, इन्स्टॉलेशन केटरिंग, आउटडोअर केटरिंग, रेस्टॉरंट आणि मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये काम करते. कंपनीच्या ग्राहकांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात अपोलो हॉस्पिटल, विप्रो कंपनी, केडी हॉस्पिटल, एचएएल, टाटा मेडिकल सेंटर सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. अशाच आणखीही अनेक कंपन्या या रांगेत असण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा