‘कू’ ला सिलीकॉन व्हॅलीतून आर्थिक बळ

‘कू’ ला सिलीकॉन व्हॅलीतून आर्थिक बळ

संपूर्ण भारतीय बनावटीच्या कू मध्ये सिलिकॉन व्हॅलीतून गुंतवणुक करण्यात आली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील नवल रविकांत आणि बालाजी श्रीनिवासन यांनी ही गुंतवणुक करण्याचे ठरवले आहे.

गेल्याच महिन्यात या दोन गुंतवणुकदारांनी कू मध्ये गुंतवणुक केली आहे. रविकांत हे ट्वीटर आणि क्लबहाऊसमधील गुंतवणुकदार आहेत. त्यांच्यासोबत बालाजी श्रीनिवासन यांनीदेखील गुंतवणुक केली आहे.

हे ही वाचा:

‘सेक्युलर’ येल प्राध्यापकाचा मोदीद्वेष उघड

इतका कन्फ्यूज मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही, मनसेचे सडेतोड

सेक्युलारिजम आणि कम्युनालिजमच्या खेळाने देशाचे मोठे नुकसान केले आहे

यापेक्षा अधिक म्हणजे गुंतवणुकीतील दिग्गज टायगर ग्लोबल देखील १०० मिलीयन डॉलरच्या गुंतवणुकीसाठी चर्चेच्या पुढच्या टप्प्यासाठी सिद्ध होत आहे.

कू चे सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सातत्याने त्यांच्या दृष्टीकोनाशी ताळमेळ साधणाऱ्या गुंतवणुकदारांशी चर्चा करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या केवळ अनुमानांवर बोलण्यास यावेळी त्यांनी नकार दिला होता.

या कंपनीवर सातत्याने लक्ष ठेवून असणाऱ्या आणखी एका गुंतवणुकदाराच्या मते तटस्थ किंवा उजव्या बाजूच्या समाजमाध्यमांना खूप वाव आहे. अनेकदा लोकांना त्यांच्यासारख्याच लोकांशी चर्चा करायच्या असतात किंवा समविचारी लोकांशी बोलण्याची गरज असते. कू ते उपलब्ध करून देते. त्याबरोबरच याच्या संस्थापकांनी हे निर्माण करून दाखवण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे सहाजिकच कू मध्ये गुंतवणुक करायला गुंतवणुकदार कायम खूश असतील.

नुकतेच माजी भारतीय क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ याने कू मधील एका चीनी कंपनीची भागीदारी खरेदी केली होती.

Exit mobile version