मेट्रो ६ मार्गिकेवरील कांजूरमार्ग स्थानक हे मुंबईतील सर्वात उंच स्थानक ठरणार आहे. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी हे १४.०७ किमी लांबीचे अंतर असून त्यामध्ये एकूण १३ उन्नत स्थानक असणार आहेत. ‘कांजूरमार्ग’ मेट्रो स्थानक १० मजली इमारती एवढी असून, सुमारे ३० मीटर एवढी उंची आहे. स्थानक उभारणीचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु आहे.
मेट्रो मार्गिका ६ मधील प्रकल्पासाठी सुमारे ६.७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून या मेट्रोमार्गाची उभारणी चालू आहे. मेट्रो ६ मार्गीकेवर कांजूरमार्ग येथील लालबहादूर शास्त्री मार्ग आणि जेव्हीएलआर जंक्शन येथे स्थानक उभारणीचे काम चालू आहे. त्यामुळे येथे पवई कडून येणाऱ्या मार्गावर प्रचंड उतार तयार होतो. त्यामुळे या भागात नैसर्गिकरित्या ३९ मीटर खोल दरी तयार झाली आहे. मात्र मेट्रो मार्गिकेला एवढा तीव्र उतार देणं शक्य नसल्याने याठिकाणी ३० मीटर उंचीवर स्थानक उभारले जाणार आहे. आता पर्यंत मेट्रो स्थानकाचे २० टक्के काम पूर्ण झालं आहे. कांजूरमार्ग स्थानकासाठी २५ मीटर उंचीचा सर्वात मोठा खांब उभारला जाणार असून २९.६० मीटर ही स्थानकाची उंची असणार आहे.
हे ही वाचा:
सोनिया गांधी माफी मांगो…मुंबईत भाजपाची निदर्शने
उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभत नाही!
१७ वर्षांवरील सर्वजण मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी करू शकणार
शाब्बास.. १७ वर्षांखालील जागतिक कुस्तीत सूरज चमकला!
मेट्रो कामाला गती देण्यासाठी एमएमआरडीए ने जोगेश्वरी येथील झोपडपट्टी हटवली आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी गती मिळणार असून, मुंबईत साधारणपणे मेट्रो स्थानकाची उंची ही १६ मीटर असून, कांजूरमार्ग येथील भौगोलिक परिस्थिमुळे या स्थानकाची उंची ३० मीटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे.