स्टार हाऊसिंग फायनान्स या कंपनीने नुकतेच ५०० कोटींचे लोन बुक करत या क्षेत्रात गरुडझेप घेतली. संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांमुळे कंपनीला हे यश गवसले. स्टार हाऊसिंग फायनान्सचे सीईओ म्हणून यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या कल्पेश दवे यांचेही यात मोठे योगदान आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती त्यांना आता संचालक मंडळावर महत्त्वाची जबाबदारी सोपवून देण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक ही महत्त्वाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
स्टार हाऊसिंग फायनान्स या कंपनीने गेल्या पाच वर्षात जबरदस्त वाटचाल करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. छोट्या कर्जपुरवठ्यासाठी ही कंपनी सातत्याने विविध कुटुंबांना मदतीचा हात देत आली आहे. त्यातून जवळपास ५ हजार कुटुंबे या कंपनीशी जोडली गेली आहेत. या कंपनीच्या विविध शहरात ३० शाखा असून २५० कर्मचारी या कंपनीच्या या वाटचालीत योगदान देत आहेत.
हे ही वाचा:
भारताच्या पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन, ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ नावाने ओळख !
कावड यात्रेला विरोध केल्याने हिंदूंनी ईदची मिरवणूकही रोखली !
मत निर्धारक, नीती निर्धारक, प्रबुद्ध समाजासोबत विहिंप साधणार संवाद
उद्योगपतीला वाचविण्यासाठी तीन आयपीएस अधिकारी महिलेला छळत होते!
प्रारंभी ६०-७० कोटींचा कर्जपुरवठा करणाऱ्या या कंपनीला संघर्ष करावा लागला, पण चिकाटीने या कंपनीने आपला प्रवास सुरू ठेवला. निमशहरी, ग्रामीण भागातील कुटुंबांना आवश्यक असणारा कर्जपुरवठा करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. कर्जपुरवठा करताना कुटुंबांशी एक नातेही तयार केले. त्यामुळे बाजारातील या कंपनीची विश्वासार्हताही वाढली.
यासंदर्भात कल्पेश दवे म्हणतात की, कंपनीच्या या यशात रिझर्व्ह बॅंक, नॅशनल हाऊसिंग बँक यांचेही योगदान आहे. ही कंपनी लिस्टेड असून त्यांच्या या वाटचालीत भागधारकांचाही वाटा असल्याचे दवे सांगतात. आता येणाऱ्या काळात १० हजार कुटुंबांना कंपनीशी जोडण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे ते सांगतात.
एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कल्पेश यांनी नरसी मोनजीमधून एमबीए केले. त्याआधी, त्यांनी इंजीनिअरिंगही पूर्ण केले आहे. मग आंतरराष्ट्रीय कंपनीत त्यांनी काम केले. त्यानंतर २०११पासून परवडण्याजोगे कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये ते काम करत आले.