कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये देशातील नोकरभरतीमध्ये वाढ झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर नोकरभरतीमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. उद्योजक आणि नोकरदारांमध्ये इंडीड या नोकरीची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने एक सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणातून बीपीओ, अर्थविषयक सेवा आणि आयटी क्षेत्रात मागणी अधिक असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात घरपोच सेवेमध्ये वाढ झाल्याने विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. या सकारात्मक बदलामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्ववत होत असल्याचे दिसून येत आहे.
सर्वात जास्त नोकरभरती ही आयटी क्षेत्रात झाली. ६१ टक्के आयटी क्षेत्रात; अर्थविषयक सेवांमध्ये ४८ टक्के, तर बीपीओमध्ये ४७ टक्के नोकरभरती करण्यात आली. ८३ टक्के उद्योजकांची मागणी ही विक्री समन्वयक या पदासाठी होती. रिलेशनशिप मॅनेजर, डिजिटल मार्केटर, युआय डिझायनरला अनुक्रमे ७७, ६९, ६१ टक्के मागणी होती. सर्वात जास्त म्हणजेच ५६ टक्के नोकरभरती ही बंगळूर मध्ये झाली, तर सर्वात कमी नोकरभरती कोलकत्ता येथे झाली. कोलकत्त्यामध्ये ३४ टक्केच सेवकांची भरती झाली.
हे ही वाचा:
पोलिस कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसा रद्द करा
तुम्ही आमच्या मुलींना हरवलंत, म्हणून आम्ही तुमच्या मुलांना हरवलं!
गणेशमूर्तिकांरांचे नुकसानच नुकसान
श्रीजेशची भिंत आणि भारताला हॉकीचे ऐतिहासिक ब्राँझ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कामगारांची संख्या कमी असल्यामुळे कामाचा ताण अधिक येत होता. आता टाळेबंदीचे नियम शिथिल झाल्यानंतर उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी ही नोकरभरती झाली आहे. निर्बंधांमुळे ४२ टक्के उद्योजकांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची किंवा कार्यालयात प्रत्यक्ष येऊन काम करण्याची अशी संमिश्र संधी दिली; तर ३५ टक्के उद्योजकांनी घरून काम करण्याचाच पर्याय दिला. ४६ टक्के कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याचा पर्याय निवडला; त्यात महिला आणि पुरुषांचे प्रमाण अनुक्रमे ५१ आणि २९ टक्के होते.