गेल्या काही दिवसांपासून १० ग्राम सोन्याचा भाव ६० हजार रुपयांच्या वर गेल्यामुळे अक्षय तृतीयेला सोन्याच्या खरेदीला संमिश्र प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु हा अंदाज चुकीचं ठरवत साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला ग्राहकांनी सोन्याची तुफान खरेदी केली. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर १० ग्राम सोन्याचा६० हजार रुपयांच्यावर असताना देखील ग्राहकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सोन्याच्या वाढलेल्या किमतीचा फायदा घेत राज्यात सर्वत्रच सकाळपासूनच सराफ दुकानात ग्राहकानी गर्दी केली होती . सोन्याचे अलंकार आणि नाणी खरेदीवर जास्त भर होता. ग्राहकांनी जोरदार खरेदी केल्यामुळे गेल्यावर्षी झालेल्या २८ टन दागिने खरेदीच्या तुलनेत यंदाच्या अक्षय तृतीयेला विक्री ३५ टनांपर्यंत जाण्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुकसार अक्षय तृतीयेला ९९९ शुद्धतेच्या सोन्याची बंद किंमत प्रति १० ग्रॅम ६०,१९१, रुपये होती, तर ९९९ शुद्धत्याच्या चांदीची किंमत प्रतिकिलो ७४,७७३ रुपये होती. सोन्याची किंमत ६० हजार रुपयांच्या पुढे जाऊनही त्याचा ग्राहकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. किमती वाढून देखील त्या खरेदीदारांचा उत्साह कमी करण्यात अयशस्वी ठरल्या. सराफ्यांच्या म्हणण्यानुसार दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांच्या एकूणच संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत १० टक्के ते १५ टक्के वाढ होण्याचा अंदाज बुलियन बाजारातील व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ यांनी न्यूज डंकाशी बोलताना सांगितले की , अक्षय्य तृतीयाची सुरुवात जोरदार झाली. सकाळपासून महाराष्ट्रभरातील आमच्या दालनात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. बुलियन आणि दागिने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला.
लग्नासाठी लागणारे दागिने, हिऱ्याचे दागिने, हलक्या वजनाचे दागिने व चांदीच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळाली. दागिन्यांच्या विक्री प्रमाणाचा विचार करता गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी १५ टक्के तर मूल्याचा विचार करता सुमारे ४० टक्के वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयाला साधारण२८ टन दागिने खरेदी झाली होती, यावर्षी हा आकडा ३५ टन पर्यंत जाईल असा अंदाज आहे. मुंबईस्थित डब्ल्यूएचपी ज्वेलर्सचे संचालक आदित्य पेठे यांनी देखील खरेदीदारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक
काँग्रेसने ७० वर्षात एकाच देशात दोन देश निर्माण करण्याचे काम केले
अतीक अहमद, अश्रफच्या हत्येचा बदला घेणार
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीचा पर्दाफाश
विक्रीत १० ते १५ % वाढ अपेक्षित
अक्षय तृतीया हा सोने खरेदीसाठी चांगला मुहूर्त मानला जातो. हा मुहूर्त ग्राहकांबरोबरच सराफा व्यवसायासाठी देखील चांगला ठरणार आहे. लग्नसराई जवळ येत आहे. अक्षय तृतीयेला झालेली लक्षणीय खरेदी आणि सोन्याचे चढत असलेले भाव लक्षात घेता येणार हंगाम ज्वेलरी व्यवसायासाठी अतिशय चांगला जाईल असा आत्मविश्वास सराफ व्यावसायिकांना वाटत आहे. पेठे म्हणाले की ,मागील वर्षाच्या आकडेवारीच्या तुलनेत विक्रीत १० % ते १५ % वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा डायमंड्सचे संचालक श्रेय मेहता म्हणाले की, ग्राहक लहान दागिन्यांच्या वस्तूंकडे आकर्षित होत आहेत .
खरेदी लग्नसराईसाठी
सोन्याच्या दरातील वाढीमुळे विक्रीवर परिणाम झाला असला तरी ग्राहक सोन्याकडे गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित मालमत्ता म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी कायम आहे. आगामी लग्नसराईसाठी ग्राहक खरेदी करत असल्याचेही मेहता यांनी सांगितले. भारतातील ग्राहकांसाठी विवाहसोहळ्यांसाठी आधीच ठरलेले बजेट असते. या वर्षी खरेदी केलेल्या ग्रॅमची संख्या कमी असली तरी, खरेदीचे एकूण मूल्य ग्राहकांनी खर्च करण्यासाठी आखलेल्या योजनेसाठी सुसंगत आहे असे मेहता म्हणाले.