जनधन खात्यांनी गाठला ५० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा

पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये ‘प्रधानमंत्री जन धन’ योजना सुरू केली होती

जनधन खात्यांनी गाठला ५० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा

देशात जन धन खात्यांनी ५० कोटींचा महत्त्वपूर्ण असा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ५६ टक्के खाती ही महिलांची आहेत. अर्थ मंत्रालयाने याबद्दल माहिती दिली आहे. एकूण उघडलेल्या जनधन खात्यांपैकी सुमारे ६७ टक्के खाती ही गावे आणि लहान शहरांमध्ये उघडण्यात आली आहेत.

देशातील सर्वसामान्य माणसाला बँकिंग सेवेशी जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘प्रधानमंत्री जन धन’ ही योजना सुरू केली होती. त्यानंतर सामान्य नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत देशात देशात जन धन खात्यांनी ५० कोटींचा महत्त्वपूर्ण असा टप्पा गाठला आहे.

या खात्यांमधील एकूण ठेवी २.०३ लाख कोटी रुपयांहून अधिक आहेत. तसेच, या खात्यांमधून सुमारे ३४ कोटी रूपे कार्ड विनामूल्य जारी करण्यात आले आहेत. या प्रधानमंत्री जन धन योजना खात्यांमध्ये सरासरी शिल्लक ४ हजार ७६ रुपये आहे आणि त्यापैकी ५.५ कोटींहून अधिक लोकांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) चा लाभ मिळत आहे.

दरम्यान, देशातील जनधन खात्यांची संख्या ५० कोटींच्या पुढे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “ही मोठी उपलब्धी आहे. यातील निम्म्याहून अधिक खाती नारी शक्तीची आहेत ही आनंदाची बाब आहे. खेडे आणि शहरांमध्ये ६७ टक्के खाती उघडण्यात आली आहेत. आर्थिक समावेशनचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतील याची आम्ही खात्री करत आहोत.”

हे ही वाचा:

म्यानमारमध्ये पळालेले २१२ भारतीय परतले भारतीय लष्करामुळे मायदेशी

उद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत

‘फलाटावरील प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली नसती तर तो वाचला असता!’

फोन करत मुख्यमंत्र्यांना केला सॅल्युट; पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई

राष्ट्रीय आर्थिक समावेशन अभियान म्हणजेच ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ २८ ऑगस्ट २०१४  रोजी सुरू करण्यात आली. गेल्या नऊ वर्षात या योजनेत खाते उघडणाऱ्यांना अनेक फायदे मिळाले आहेत. विशेष म्हणजे या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. याशिवाय मोफत रुपे डेबिट कार्ड, २ लाख रुपयांचा अपघाती विमा आणि १० हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे.

Exit mobile version