23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरअर्थजगतबहुचर्चित आयफोन १५ आला!; चाहत्यांची प्रतीक्षा संपली

बहुचर्चित आयफोन १५ आला!; चाहत्यांची प्रतीक्षा संपली

ऍप्पलने अखेरीस आयफोनची नवीन १५ मालिका जाहीर केली.

Google News Follow

Related

बहुप्रतीक्षित अशा आयफोन १५, आयफोन १५ प्रो मॉडेल्सची अखेर घोषणा झाली आहे. भारतात याची किंमत ७९ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते. तर, अमेरिकेच्या बाजारात ही किंमत ७९९ अमेरिकी डॉलरपासून सुरू होणार आहे.
अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर ऍप्पलने अखेरीस आयफोनची नवीन १५ मालिका जाहीर केली. या वर्षीही कंपनीने आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स आवृत्ती असे चार मॉडेल सादर केले आहेत. मात्र कोणताही अल्ट्रा प्रकार जाहीर झालेला नाही.

 

यूएसबी-सी पोर्ट ते डायनॅमिक आयलंडपर्यंत, ऍप्पलने नवीन आयफोन्सच्या डिझाइन भागामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. दोन्ही प्रो मॉडेल्सचे हार्डवेअर अद्ययावत करण्यात आले आहेत. आयफोन १५ प्रोची किंमत अमेरिकेमधील जुन्या मॉडेलइतकीच असेल. याचा अर्थ ‘प्रो’ची किंमत ९९९ अमेरिकी डॉलर आहे, तर प्रो मॅक्सची किंमत १, १९९ डॉलर आहे. हे उपकरण २२ सप्टेंबर रोजी अमेरिकेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु, भारतीय बाजारपेठेत प्रो मॉडेल्सच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

 

 

भारतात, आयफोन १५ प्रो मॉडेलची किंमत १ लाख ३४ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते आणि प्रो मॅक्सची किंमत एक लाख ५९ हजार ९०० रुपये असेल. आयफोन १५ची, १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत भारतात ७९ हजार ९०० रुपये आहे आणि प्लस मॉडेलची किंमत ८९ हजार ९०० रुपये आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाची पुतीन यांना भुरळ

भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत

मुंब्रा येथे रेती उपसा करणाऱ्या बार्जवर सापडली स्फोटके

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला

 

आयफोन १५ मालिकेने जुने डिझाइन कायम ठेवले आहे. जुन्या बॉक्सी डिझाइनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा व्यवस्था आहे. डिझाइनमधील सर्वात मोठा बदल म्हणजे तळाशी यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. त्यामुळे आता ऍप्पलच्या ग्राहकांना त्यांच्या आयफोनसाठी वेगळा चार्जर घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.

 

 

ऍपलने म्यूट स्विच बटणाच्या जागी नवीन ऍक्शन बटणही दिले आहे. त्यामुळे यूजर्सना शॉर्टकट पद्धतीने कॅमेरा, फ्लॅशलाइट सुरू करू शकतात. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळ्या रंगामध्ये उपलब्ध असतील. आयफोन १५च्या स्टँडर्ड आणि प्लस मॉडेलमध्ये ४८ मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा सेन्सर आहे. चांगल्या छायाचित्रणाच्या अनुभवासाठी नवीन नाईट मोड, स्मार्ट एचडीआर मोड आणि इतर कॅमेरा मोड आहेत. वापरकर्ते ४ के व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासही सक्षम असतील. तसेच, आयफोन १५ची बॅटरी दिवसभर चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, कॉलदरम्यान गोंगाटाच्या वातावरणातही तुमचा आवाज प्रभावीपणे समोरच्याला ऐकू येईल, असे अद्ययावत तंत्रज्ञान यात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा