गेले काही दिवस शेअर बाजारात चढ उतार दिसून आले होते. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने केलेल्या टॅरिफच्या घोषणांचा परिणाम जगभरात दिसून आला होता. यानंतर ट्रम्प यांनी जगभरातील काही देशांना आयात शुल्काच्या निर्णयाला स्थगिती देत काहीसा दिलासा दिला होता. यानंतर शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली होती. वाढत्या व्यापार तणावादरम्यान जागतिक गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला होता. यानंतर पुन्हा एकदा मंगळवारी शेअर बाजारात तेजी असल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारच्या सुट्टीनंतर मंगळवार, १५ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मंगळवारी भारतीय शेअर बाजार तेजीत उघडला. अमेरिकन सरकारच्या टिप्पण्या आणि कृतींमुळे संभाव्य कर सवलतीचे संकेत मिळाल्यानंतर ही तेजी आली. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. निफ्टी ५० निर्देशांक ५३९.८० अंकांनी किंवा २.३६ टक्क्यांनी वाढून २३,३६८.३५ वर उघडला, तर बीएसई सेन्सेक्स १,६७९.२० अंकांनी किंवा २.२३ टक्क्यांनी वाढून ७६,८३६.४६ वर सुरू झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे विशेषतः सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आणखी व्यापार सवलती जाहीर करू शकतात या संकेतांमुळे बाजारात हालचाली दिसून आल्या.
मंगळवारी, निफ्टीवर बँक, फायनान्शियल, आयटी, मेटल, फार्मा, ऑटो, एफएमसीजी आणि रिअल्टीमधील कंपन्यांची स्थिती चांगली होती तर, इतर क्षेत्रातही गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी मिळाली. आज सेन्सेक्सचे सर्व ३० शेअर्स हिरव्या रंगात दिसले. टाटा मोटर्स, HDFC बँक, M&M, LT, भारती एअरटेल आणि ICICI बँक टॉप गेनर्स ठरले.
हे ही वाचा :
“वक्फ मालमत्ता तृणमूल नेत्यांच्या, म्हणूनच बंगालमध्ये हिंसाचार”
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी १२५ वर्षे जुन्या कराराचा वापर; काय आहे करार?
मुर्शीदाबादेत दंगलखोरांकडून लाखोंची लूट, कायमचा बीएसएफ कॅम्प हवा!
इस्रायल- हमासमधील युद्धबंदीची चर्चा फसली; ‘ही’ आहेत कारणे
भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच- सहा महिन्यांपासून विक्रीचे सत्र सुरू असून या दरम्यान काही वेळा भारतीय शेअर बाजाराने उसळी पण घेतली. ट्रम्प यांनी जगाभरातील देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय शेअर बाजार एका दिवसात ५ टक्क्यांहून अधिकने घसरला. तर आता ट्रम्प यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असून याचा परिणाम इतर देशांप्रमाणेचं भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे.