27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतशेअर बाजारात गुंतवणुकीचा पाऊस

शेअर बाजारात गुंतवणुकीचा पाऊस

ऑगस्टमध्ये विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वीस महिन्यांच्या उच्चांकावर, खरेदी ५१ हजार कोटींच्या पार

Google News Follow

Related

तेलाच्या किमतीतील स्थिरता आणि जोखीम वाढल्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (एफपीआय) कल भारताकडे वाढला आहे. परकीय गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये भारतीय शेअर बाजारात ५१ हजार २०० कोटी रुपयांपक्ष जास्त गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार वीस महिन्यांतील हा सर्वाधिक आवक आहे.

यापूर्वी जुलैमध्ये एफपीआयने सुमारे ५ हजार कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. सलग नऊ महिने मोठ्या प्रमाणावर निव्वळ विक्री केल्यानंतर जुलैमध्ये एफपीआयने प्रथमच निव्वळ खरेदी केली. ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान त्यांनी भारतीय शेअर बाजारातून २.४६ लाख कोटी रुपये काढले होते.

विदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीचा सपाटा

सॅन्क्टम वेल्थचे उत्पादन आणि सोल्युशन्सचे सह-प्रमुख मनीष जेलोका म्हणाले की, भारत या महिन्यात निव्वळ गुंतवणुकीच्या ओघाची नोंद करेल. पण हा वेग ऑगस्टच्या तुलनेत कमी असू शकतो. अरिहंत कॅपिटल मार्केट्सचे
संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अर्पित जैन म्हणाले की, चलनवाढ, डॉलरचा कल आणि व्याजदर एफपीआयचा कल निश्चित करतील.

शेअर बाजारात वाढ कायम

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स ३६.७४ अंकांच्या वाढीसह ५८ हजार ८०३ वर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे निफ्टी जूनमध्ये १५ हजाराच्या जवळ गेला होता. आता पुन्हा बाजारात सुधारणा होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये रशियन दूतावासाजवळ स्फोट, २० जण ठार

‘उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, धोका देणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे’

‘मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलनातून दिशाभूल केली आता माफी मागा’

हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?

शेअर बाजारातील रिकव्हरीनंतर आयपीओ बाजारातही तेजी येऊ लागली आहे. आता दर आठवड्याला आयपीओ येत आहेत. तसेच, आयपीओमध्ये पुन्हा लिस्टिंग झाल्यावर नफा कमावला जात असल्याचं दिसून येत आहे. ज्या कंपन्यांचे आयपीओ येणार होते ते आता पुन्हा सक्रिय झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा