इन्फोसिसमध्ये ३५ हजार नव्या नोकऱ्या

इन्फोसिसमध्ये ३५ हजार नव्या नोकऱ्या

इन्फोसिस ही देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. इन्फोसिसमध्ये काम करावं अशी अनेकांची इच्छा असते. अनेकांची ती इच्छा लवकर पूर्ण होणार आहे, कारण इन्फोसिसने २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात जवळापास ३५,००० कॉलेज ग्रॅज्युएट्सना (पदवीधर) नोकरी देण्याची योजना आखली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे खासगी क्षेत्रात अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आर्थिक फटका बसला आहे, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे.

डिजिटल क्षेत्रातील एक्सपर्ट्सची मागणी जसजशी वाढत गेली तसतसं काही काळानंतर हे इंडस्ट्रीसाठी एक आव्हान बनतं. प्रवीण राव पुढे म्हणाले की, जागतिक स्तरावर वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही वित्तीय वर्ष २०२२ साठी ३५,००० महाविद्यालयीन पदवीधर विद्यार्थ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे. इन्फोसिसमध्ये कर्मचार्‍यांचा नोकरी सोडण्याचा दर जूनच्या तिमाहीत १३.९ टक्क्यांनी वाढला आहे. तर मार्चच्या तिमाहीत हा दर १०.९ टक्क्यांवर होता.

हे ही वाचा:

कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही

पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत

‘त्या’ दिव्यांगाच्या कुटुंबाला द्या ५० लाख

वाहतूक पोलिसांचे ई चलान मशीनच चोरले

इन्फोसिस ही देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी आहे. कंपनीने बुधवारी, १४ जुलै रोजी आपला जून तिमाहीचा रिपोर्ट जारी केला आहे. २०२२ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर २२.७ टक्क्यांनी वाढून ५१९५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४२३३ कोटी रुपये होता.

तिमाही आधारावर मार्च २०२१ च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा ५०७८ कोटी रुपये होता. कंपनीची एकत्रित कमाई वार्षिक आधारावर १८ टक्क्यांनी वाढून २८,९८६ कोटी रुपये झाली आहे. एका वर्षापूर्वी ही कमाई २३,६६५ कोटी रुपये होती.

Exit mobile version