24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतएलपीजी गॅसच्या पोटात दडलंय काय?

एलपीजी गॅसच्या पोटात दडलंय काय?

Google News Follow

Related

सध्या आपल्या देशात महागाईचा भडका उडत आहे. यामध्ये आता घरगुती एलपीजी सिलेंडरने भर घातली आहे. नुकताच एलपीजी सिलेंडरचा भाव ५० रुपयांनी वाढून हजाराच्या घरात पोहचला आहे. एलपीजी सिलेंडरचे भाव वाढल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. मात्र ही आताची स्थिती नाही आहे. याआधीही युपीए सरकारच्या काळात गॅस सिलेंडरचा भाव एवढाच होता. फरक फक्त एक होता यावर युपीए सरकार सबसिडी देत होते. आपल्याला या सिलेंडरची किंमत यूपीए सरकारच्या काळात ४१० रुपये होती आणि त्यावर सरकार ८२७ रुपयांची सबसिडी होते. मात्र याचा पूर्ण भार सरकारच्या तिजोरीवर येत होता म्हणजे तेव्हा एलपीजी सिलेंडरचा भाव १ हजार २०० रुपयांच्या घरात होता आणि आता हजार रुपयांच्या घरात गॅसचा भाव आहे. या किमतीचा खुलासा खुद्द राहुल गांधी यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला. त्यामुळे आता मुंबईत १४ किलो २०० ग्रॅम सिलेंडरचा भाव ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना सिलेंडर मिळणार आहे. पेट्रोल डिझेल प्रमाणे प्रत्येक राज्यात गॅस सिलेंडरचे भाव देखील वेगळे असले तरी सध्या देशातील प्रत्येक राज्यात जवळपास गॅस सिलेंडरचा भाव ९०० रुपयांपेक्षा पेक्षा जास्त आहे.

भारत देश हा जगातील सर्वात मोठा दुसरा गॅस आयातदार आहे. आपल्या देशाच्या जवळपास अर्ध्याहून जास्त गॅसच्या गरजा परदेशी पुरवठादारांकडून पुरवल्या जातात. यामध्येसुद्धा प्रामुख्याने सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि कुवेतमधील पश्चिम आशियाई उत्पादकांकडून आपल्या गरजा पूर्ण होतात. त्यामुळे एलपीजीची किंमत वाढणे किंवा कमी होणे हे आपल्या हातात नसते. एलपीजीची किंमत ही इम्पोर्ट पॅरिटि प्राइजच्या आधारे ठरवली जाते. आयपीपी हे आतंरराष्ट्रीय वस्तूंच्या किमतीवर अवलंबून असते. आयपीपीची किंमत ठरवण्यासाठी सौदी अरेबियाच्या ‘सौदी आरामको’ तेल कंपनीचा मोठा वाटा आहे.

सौदी अरामको ही एक सौदी अरेबियाची तेल कंपनी आणि नैसर्गिक वायू कंपनी आहे. ही कंपनी कमाईच्या बाबतीत आणि तेल कंपन्यांमधील जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. म्हणजे जी एलपीजी सिलेंडरची किंमत सौदी आरामको कंपनी ठरवते तीच किंमत एलपीजी गॅससाठी अंतिम किंमत असते. ही कंपनी एलपीजी सिलेंडरची किंमत मालवाहतूक शुल्क, कस्टम ड्युटी म्हणजेच सीमा शुल्क, फ्री ऑन बॉर्ड प्राईज आणि पोर्ट अँड इन्शुरन्सच्या आधारे ठरते. आंतरराष्ट्रीय पातळीवर जी काही किंमत ठरवली जाते ती डॉलरमध्ये असते त्यांनतर डॉलरची किंमत मग आपण आपल्या रुपयात रूपांतरित करून घेतो. यामध्ये डॉलरच्या किंमतीत रुपयाची किती किंमत आहे हे सुद्धा महत्वाचे असते. जर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर साहजिकच आपल्याला एलपीजी गॅसची किंमत महाग पडते. ही किंमत आंतरराष्ट्रीय पुढे भारतात या किमतीवर पुन्हा जीएसटी, डीलर कमिशन,बाटल्याची किंमत, स्थानिक मालवाहतूक शुल्क, मार्केटिंग कॉस्ट हे सर्व शुल्क लावून जी किंमत येते ती किंमत ग्राहक एलपीगी गॅससाठी मोजतो. यामुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एलपीजीच्या किमतीत चढउतार येतो तेव्हा साहजिकच याचा भारतावर सुद्धा परिणाम होतो.

२०१४ मध्ये एलपीजी गॅसचा वापर करणाऱ्यांची संख्या १४ करोड ८० लाखाच्या आसपास होती हीच संख्या २०२२ मध्ये दुप्पट झाली आहे. २०२१ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार, भारतात २९ करोड ११ लाख लोक एलपीजी सिलेंडरचा वापर करतात. भारतात जशी एलपीजीचे मागणी वाढत आहे तशीच जगात इतर देशांतही एलपीजीची मागणी वाढतेय. मागणी वाढल्याने सहाजिकच याचा किमतीवर परिणाम होत आहे. याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे, एलपीजी सिलेंडरच्या कच्च्या मालाच्या किमतीत होणारी वाढ. एलपीजी सिलेंडर हा प्रोपेन आणि ब्युटेन या दोन घटकांपासून बनतो. गॅस बनवण्यासाठी प्रोपेनचा ४० टक्के आणि ब्युटेनचा ६० टक्के वापर केला जातो. याच दोन घटकांची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर काही वर्षापासून वाढत आहे. प्रोपेनची किंमत एप्रिल २०२० मध्ये २३० डॉलर प्रति मेट्रिक टन होती तर ब्युटेनची किंमत २४० डॉलर प्रति मेट्रिक टन होती. हीच किंमत २०२१ डिसेंबर मध्ये ७९५ डॉलर प्रति मेट्रिक टन तर ब्युटेनची किंमत ७५० डॉलर प्रति मेट्रिक टन झाली. म्हणजेच, एका वर्षात या घटकांची किंमत तीनपट झाली आहे. त्यामुळे कच्या मालाच्या किमतीत वाढ होणं हे सुद्धा सिलेंडरसाठी एक महत्वाचे कारण आहे.

त्याशिवाय एलपीजी सिलेंडरचा भाव वाढण्याचा अजून एक कारण म्हणजे रशिया युक्रेन युद्ध. रशिया देश हा तेल आणि गॅसचा प्रमुख निर्माता आहे. या रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाची किंमत वाढली आहे. तेलाच्या किमतीचा परिणाम हा गॅसच्या किमतीवर सुद्धा होतो. म्हणजेच थोडक्यात एलपीजी सिलेंडरचा भाव मागणी व पुरवठ्यावर आणि आतंरराष्ट्रीय मार्केटमध्ये डॉलरच्या किंमतीत रुपयाची होणारा चढउतार तसेच काही नैसर्गिक आणि अनैसर्गिक घटना यावर एलपीजी सिलेंडरचा भाव अवलंबून असतो. त्यामुळे एलपीजीची किंमत वाढणं किंवा कमी होणं हे आपल्या हातात नसत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा