मे महिन्यात महागाईत किरकोळ घट! सर्वसामान्यांना दिलासा

मे महिन्यात महागाईत किरकोळ घट! सर्वसामान्यांना दिलासा

महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. भारताचा किरकोळ चलनवाढीचा दर मे महिन्यात ७.०४ टक्के इतका होता. जो एप्रिल महिन्याच्या तुलनेत किंचित कमी आहे. एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ७.७९ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, महागाईचा दर अजूनही आरबीआयच्या नियंत्रणाबाहेर आहे. सोमवार,१३ जून रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढीचा दर एप्रिलमध्ये ७.७९ टक्क्यांवरून घसरून ७.०४ टक्के झाला आहे. मे महिन्यात खाद्यपदार्थ, पेट्रोल-डिझेल आणि विजेच्या दरात कपात झाल्याने महागाईचा दर कमी झाला आहे.

वस्तूंसाठी सीपीआय-आधारित महागाई एप्रिलमध्ये ७.७९ टक्के, मार्चमध्ये ६.९५ टक्के, फेब्रुवारीमध्ये ६.०७ टक्के आणि जानेवारीमध्ये ६.०१ टक्क्यांनी कमी झाली आहे .सीपीआय बास्केटचा जवळपास निम्मा वाटा असलेला अन्नधान्य महागाई मे महिन्यात वार्षिक आधारावर ७.९७ टक्क्यांवर पोहोचली आहे. मात्र एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात खाद्यपदार्थ थोडे स्वस्त झाले होते. एप्रिलमध्ये अन्नधान्य चलनवाढ ८.३१ टक्के होती.

हे ही वाचा:

आफरिन नेहमीच राहिली वादविवादांच्या केंद्रस्थानी

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुण्यतिथीनिमित्त मोखाड्यात कार्यक्रम

“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”

परदेशात बँक खाते आहे का, किती रक्कम आहे? ईडीने राहुलना विचारले

अर्थशास्त्रज्ञ कुणाल कुंडू म्हणाले की, हा सलग पाचवा महिना आहे की महागाईने आरबीआयची सहा टक्क्यांवरची मर्यादा ओलांडली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात थोडासा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे किरकोळ महागाई कमी झाली आहे.

Exit mobile version