पहिल्यांदाच कोणत्याही भारतीय हवाई कंपनीला एका आर्थिक वर्षात एक अब्ज डॉलरचा नफा झाला आहे. ही कामगिरी केली आहे, इंडिगोने. राहुल भाटियाने स्थापन केलेल्या एलसीसीने गुरुवारी जानेवारी-मार्च या तीन महिन्यांत एक हजार ८९५ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली. हा नफा गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीच्या ९१९ कोटी रुपयांपेक्षा १०६ टक्क्यांनी अधिक आहे.
नुकसानानंतर मोठा नफा
या आर्थिक वर्षात कंपनीला आठ हजार १७२.५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर, गेल्या आर्थिक वर्षात ३०६ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. गुरुवारी मुंबई शेअर बाजारात या कंपनीचे समभाग ०.९ टक्क्यांनी वाढून ४,४००.६ रुपयांवर बंद झाले.
हे ही वाचा:
वेदांत अग्रवालचा आक्षेपार्ह भाषेतला व्हिडीओ व्हायरल; जामीन मिळाल्यावर म्हटलं रॅप साँग
मोहाली पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई, ४.३७ कोटी रुपयांची रोकड जप्त!
वेंगुर्ले बंदरात बोट पलटली, दोघांचा मृत्यू!
मीडियाचा डाव फडणवीसांनी उधळला !
इंडिगो बिझनेस क्लास सुरू करणार
इंडिगोने या वर्षी वर्दळीच्या हवाई मार्गांवर ‘बिझनेस क्लास’ची सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ऑगस्टमध्ये इंडिगोला १८ वर्षे पूर्ण होत असताना या संबंधीची माहिती, उद्घाटनाची तारीख व मार्गांबाबत माहिती दिली जाईल.
नव्या सेवांबाबत सीईओ उत्सुक
कंपनीला नफा मिळताच प्रवाशांना आणखी नव्या सेवा देण्यासाठी इंडिगोचे सीईओ उत्सुक आहेत. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स याने सांगितले की, एअरलाइनकडून सतत नव्या सेवांचा विचार सुरू आहे. भारत ज्या प्रकारे जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू पाहते आहे, नव्या भारताला प्रवासी व्यवसायात अधिकाधिक पर्याय देणे, हे आमचे सौभाग्य असेल.