सेवा क्षेत्राच्या वाढीची गेल्या १३ वर्षातील मोठी भरारी

वित्तीय, विमा क्षेत्रांची सर्वोत्तम कामगिरी

सेवा क्षेत्राच्या वाढीची गेल्या १३ वर्षातील मोठी भरारी

देशातील सेवा क्षेत्राने पुन्हा वेग घेतला आहे. मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे नवीन व्यवसाय आणि उपादानात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी देशाच्या सेवा क्षेत्राच्या वाढीने गेल्या १३ वर्षातील उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे महागाई आणि असतानाही त्याचा सेवा क्षेत्राच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला असल्याचे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.

सेवा क्षेत्राच्या कामगिरीचा मागोवा घेणाऱ्या एस अँड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेसच्या पीएमआय निर्देशांक मार्चमधील ५७. ८ वरून एप्रिलमध्ये ६२ वर पोहोचला. ही वाढ देशाच्या व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील घडामोडींमध्ये २०१० पासून झालेली सर्वात वेगवान वाढ व विस्तार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. बाजारातील अनुकूल वातावरण, मागणीत झालेली वाढ आणि त्याच्याच जोडीला नवीन व्यवसायाला मिळालेली गती यामुळे सेवा क्षेत्राने ही मोठी झेप घेतली आहे.

विशेष म्हणजे गेल्या २१ महिन्यांमध्ये पीएमटी निर्देशांक सतत ५० च्या वर आहे. पीएमआय निर्देशांक म्हणजेच खरेदी व्यवस्थापन निर्देशांक ५० च्या वर असणे हे उद्योग विस्तार होत असल्याचे द्योतक मानले जाते तर ५० च्या खाली हा उद्योगांच्या घसरणीचा काळ म्हणून समजले जाते.

भारताच्या सेवा क्षेत्राची कामगिरी एप्रिलमध्ये अतिशय प्रभावी ठरली आहे. या कालावधीत नवीन व्यवसाय आणि उत्पादनात झालेली वाढ ही गेल्या १३ वर्षांतील सर्वाधिक आहे. वित्तीय आणि विमा क्षेत्रांनी सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे ही वाढ झाली असल्याचे एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्र भागाच्या सहयोगी संचालक पॉलियम दे लिमा यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गव्हानंतर साखरेवर निर्यात बंदी येण्याची शक्यता

संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!

शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती

राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!

एप्रिलमध्ये भारतीय सेवांच्या आंतरराष्ट्रीय मागणीत लक्षणीय सुधारणा झाल्याची नोंद कंपन्यांनी केली आहे. नवीन निर्यात व्यवसायात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ झाली. तथापि, किंमतीच्या आघाडीवर, एप्रिलमध्ये उत्पादन खर्च गेल्या तीन महिन्यांतील सर्वात जलद दराने वाढला. खाद्यपदार्थ, इंधन, औषधे, वाहतूक आणि मजुरी हे महागाईचे हे त्याचे मुख्य घटक आहेत. ग्राहक सेवांमध्ये सरासरी खर्चात सर्वात जलद वाढ झाली आहे. न तरीही सेवा उद्योगाने वाढीचा कल कायम ठेवल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

Exit mobile version