आत्मनिर्भर भारताची चीनकडून होणारी आयात घसरली

आत्मनिर्भर भारताची चीनकडून होणारी आयात घसरली

भारत-चीन उभयपक्षी व्यापारात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.६४ टक्कांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी, २०१९ मध्ये दोन्ही देशांत ९२.८९ बिलियन अमेरिकन डॉलरचा व्यापार झाला होता, तो या वर्षात ८६.६५ डॉलरपर्यंत खाली आला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून हा भारत-चीन व्यापाराची ही आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, भारताची चीनकडून होणारी आयात १०.८७ टक्क्यांनी घसरली आहे.

हे ही वाचा:

पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताची चीनला होणारी निर्यात १६.१५ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी भारताने १७.८९६ बिलियन अमेरिकन डॉलर किंमतीची निर्यात केली होती, ती वाढून २०२० मध्ये २०.८७ बिलियन अमेरिकन डॉलर एवढ्या किंमतीची निर्यात केली आहे.

त्यामुळे चीनशी होणाऱ्या व्यापारातील तूट ५६.९५ बिलियन अमेरिकन डॉलरपासून ४५.९१ बिलियन डॉलर पर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे ही तूट आता १९.३९ टक्के राहिली आहे.

भारताने काही क्षेत्रातील निर्यातीत तीव्र वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने खनिजांचा समावेश आहे. यात लोह, स्टील, ऍल्युमिनियम आणि तांबे या खनिजांचा समावेश होतो. त्यामुळे सध्या भारत चीनचा चौथ्या क्रमांकाचा लोह खनिज निर्यातदार आहे. कृषी क्षेत्रात भारताकडून साखर, तांदूळ, तेल इत्यादी उत्पादनांची निर्यात करण्यात आली होती.

Exit mobile version