भारताचा विकास दर कायम आठ टक्के राहिल्यास पुढील सात ते आठ वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊ शकते, अशी माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली आहे. एका कार्यक्रमाला संबोधताना राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेने अनेक वर्षांपासून विकास दर ८.५ टक्के राखला आहे. त्यामुळे भारताला सात ते आठ वर्षात अर्थव्यवस्था दुप्पट करणे कठीण राहणार नाही. जर महामारीची चौथी लाट आली नाही किंवा युक्रेनच्या संकटाचा गंभीर परिणाम झाला नाही, तर आपण आठ टक्क्यांच्या दराने वाढ करू शकतो. यापूर्वी आम्ही ते केले आहे, असे एका कार्यक्रमात कुमार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, भारतासाठी पाच हजार अब्ज डॉलरचे उद्दिष्ट हे लवकरच पूर्ण होणार आहे. कारण सध्या भारताची अर्थव्यवस्था २ हजार ७०० अब्ज डॉलरच्या घरात आहे. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे, अन्यथा मोदी सरकार फार पूर्वीपासून पाच हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत आहे. भारताने नुकताच निर्यातीत चारशे अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. जर भविष्यात असेच सुरळीत सुरू राहिले तर आपण येत्या आठ वर्षांमध्ये दुप्पट अर्थव्यवस्थेचे उदिष्ट गाठू शकतो असा विश्ववास राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली
‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ
…म्हणून चीनचे वांग यी मोदींना भेटायला आले होते!
चीनमधील त्या विमान अपघातात १३२ जणांचा मृत्यू
भारताने २००३ पासून ते २०११ पर्यंत सातत्याने ८.५ टक्के विकासदर कायम ठेवला होता. त्यानंतर त्यात आणखी वृद्धी झाली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोना संकट आहे. कोरोना संकटाचा सामना देशाला करावा लागला. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सर्व उद्योग धंदे ठप्प होते त्याचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला आहे. मात्र त्यातून आता भारताची अर्थव्यवस्था सावरत आहे.