भारताचा वार्षिक ७.८ टक्के विकासदर अनेक आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या विकासदरापेक्षा जास्त

मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची माहिती

भारताचा वार्षिक ७.८ टक्के विकास दर इतर आघाडीच्या अर्थव्यवस्थाांच्या विकास दरापेक्षा जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या शेवटच्या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकासाने मजबूत गती कायम राखली असल्याचे मत वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांनी स्पष्ट केले.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने २०२३-२४ च्या एप्रिल-जून तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाची अंदाजित आकडेवारी स्थिर २०११-१२ आणि सध्याच्या किंमती जारी केल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागारांनी ही माहिती दिली.

हेही वाचा..

पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देणार

मान्सून परत येतोय, हवामान विभागाकडून आनंदाची बातमी

झुरिच डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

यावेळी बोलताना डॉ. नागेश्वरन म्हणाले, एकूणच भारताचे आर्थिक स्थैर्य आणि वाढीचे अंदाज ही अर्थव्यवस्थेची बलस्थाने आहेत आणि पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन आकडेवारीने सरकारच्या एकूण स्थूल-आर्थिक व्यवस्थापनाच्या विशेषत: कोविड महामारीच्या काळात या दोन प्रमुख पैलूंना मजबूत केले आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर भांडवली खर्चात वाढ, विशेषत: ग्रामीण भागातील मोठी मागणी आणि सेवा क्षेत्रातील सुधारित कामगिरी याच्या बळावर भारताच्या अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत सर्वात जलद गतीने वाढ नोंदवली.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सर्वाधिक सकारात्मक असलेली गोष्ट म्हणजे खाजगी क्षेत्राकडून भांडवलाची यथायोग्य निर्मिती सुरू आहे. भविष्यातील रोजगार निमिर्ती आणि भारतीय कुटुंबांचा आर्थिक स्त्रोत वाढण्याच्या दृष्टीने हे सुचिन्ह असल्याचे डॉ. नागेश्वरन यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version