ट्रम्प यांच्या सवलतीनंतर भारतीय शेअर बाजार रुळावर; सेन्सेक्समध्ये उसळी

शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या रंगात

ट्रम्प यांच्या सवलतीनंतर भारतीय शेअर बाजार रुळावर; सेन्सेक्समध्ये उसळी

Technology concept graph, business finance analysis marketing and profit

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरचा फटका जगभरातील बाजारांना दोन दिवसांपूर्वी बसला होता. यात भारताचाही समावेश होता. भारतावर २६ टक्के कर लादण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर भारतीय बाजारानेही ऐतिहासिक अशी पडझड अनुभवली होती. दरम्यान, ट्रम्प यांच्याकडून भारतासह इतर काही देशांवरील अतिरिक्त व्यापार कर ९० दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम इतर आशियाई बाजारांसह भारतीय शेअर बाजारामध्ये पाहायला मिळाला.

ट्रम्प यांच्या ९० दिवसांच्या या सवलतीनंतर शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या रंगात झाली. सकाळी ९:३८ वाजता, सेन्सेक्स १,३४९ अंकांनी किंवा १.८३ टक्क्यांनी वाढून ७५,१९६ वर पोहोचला आणि निफ्टी ४४४ अंकांनी वाढून २२,८४३ वर पोहोचला. लार्ज कॅपसोबतच मिड कॅप आणि स्मॉल कॅप देखील हिरव्या रंगात दिसून आले. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ८९९ अंकांनी म्हणजेच १.८१ टक्क्यांनी वाढून ५०,४८१ वर आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ३११ अंकांनी म्हणजेच २.०४ टक्क्यांनी वाढून १५,५६८ वर बंद झाला.

आज निफ्टीवर बँक, फायनान्शियल, ऑटो, आयटी, मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि रिअल्टी निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. आजच्या सर्वाधिक वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये सनफार्मा, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टेक एम, अल्ट्रासेम्को, एलटी यांचा समावेश आहे. तोट्यात असलेल्या कंपन्यांमध्ये TCS, INDUSINDBK यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

चीनला दणका; आयातीवरचा कर १२५ टक्के नव्हे, तर १४५ टक्के! कसा ते घ्या जाणून

न्यूयॉर्क: हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून सीमेन्सच्या सीईओंचा मृत्यू

तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी; चौकशीतून कोणते खुलासे होणार?

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाला अटक

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर व्यापार कर लादले. याचा परिणाम जगभरात झाला. यामध्ये जगभरातील ६० हून अधिक देशांचा समावेश होता. भारतासारख्या देशांवर अतिरिक्त व्यापार करही लादण्यात आले. सध्या ट्रम्प यांनी या निर्णयाला स्थगिती दिली असून आता याचा परिणामही बाजारांवर दिसून येत आहे.

भाजपाच्या प्रयोगशाळेत, काँग्रेसचा प्रयोग...  | Dinesh Kanji | Rahul Gandhi | Congress | Priyanka

Exit mobile version