कोविड महामारी रेल्वेच्या पथ्यावर

कोविड महामारी रेल्वेच्या पथ्यावर

मालवाहतूकीतून फायदा अपेक्षित

कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंदे मंदावलेले असताना मालवाहतूकीच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेला फायदा होणार असे चित्र आहे.

कोविडच्या संकटामुळे प्रवासी वाहतूक कमी झाली असली तरी मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करणे मात्र या काळात शक्य झाले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक मालाची ने-आण शक्य झाली. याचाच परिणाम म्हणून भारतीय रेल्वेला मालवाहतूकीतून वर्षाखेरपर्यंत मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीपर्यंत फायदा अपेक्षित आहे. 

हे ही वाचा: भारतीय रेल्वे मोठ्या प्रमाणात पार्सल डबे बनविण्याच्या तयारीत, मालवाहतूकीवर रेल्वेचा सर्वाधिक खर्च

भारतीय रेल्वेचे देशभरात विस्तृत जाळे आहे. सध्या भारताच्या एकूण वाहतूकीपैकी सुमारे २७% वाहतूक रेल्वेमार्फत होते. सामान्यतः सिमेंट, कोसळा, स्टील इत्यादी वस्तुंची वाहतूक रेल्वेमार्फत होते, मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे रेल्वेच्या या पारंपारिक वस्तुंच्या वाहतूकीत घट झाली होती. तरीही, त्यांच्याऐवजी धान्य, पेट्रोलियम, कंटेनर वाहतूक वाढ झालेली होती. या वर्षी झालेल्या मालवाहतूकीतून रेल्वेला झालेला खर्च भागण्याची अपेक्षा आहे. “भारतीय रेल्वेने आपला उत्पादन खर्च काढण्याचे ध्येय निश्चित केले आहे. रेल्वेमार्फत वाढलेली मालवाहतूक हे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे द्योतक आहे.” असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सी.ई.ओ विनोद कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतीय रेल्वेने ‘व्हिजन २०२४’ अंतर्गत २०२४ पर्यंत मालवाहतूक २०२४ दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचे व मालवाहतूकीची गती सर्वसाधारण ५० किमी/तास करण्याचे ध्येय निर्धारीत केल्याचे ‘द हिंदू’ च्या वृत्तानुसार समजते.

Exit mobile version