निवृत्त नौदल सैनिकांना फ्लिपकार्ट मार्फत पुनर्रोजगाराची संधी

निवृत्त नौदल सैनिकांना फ्लिपकार्ट मार्फत पुनर्रोजगाराची संधी

भारतीय नौदलातील निवृत्त सैनिकांना आता पुन्हा रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. फ्लिपकार्ट या प्रसिद्ध ऑनलाइन रिटेल ब्रँड तर्फे या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. भारतीय नौदलाच्या इंडियन नेव्हल प्लेसमेंट एजंसी (आयएनपीए) आणि फ्लिपकार्ट या कंपनीमध्ये एक सामंजस्य करार झाला आहे बुधवार, १५ सप्टेंबर रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

भारतीय नौदलाचे कार्मिक सेवा नियंत्रक व्हाइस एडमिरल सूरज बेरी आणि फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष रजनीश कुमार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी भारतीय नौदल आणि फ्लिपकार्टचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. फ्लिपकार्टने त्यांच्या ‘फ्लिपमार्च’ योजनेनुसार हा कार्यक्रम हाती घेतला आहे. माजी सैनिकांनी त्यांच्या सेवा कालावधी दरम्यान मिळवलेली पात्रता, अनुभव आणि गुणविशेष यानुसार त्यांना पुनर्रोजगाराची संधी प्रदान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हे ही वाचा:

तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…

जान मोहम्मद हे केवळ प्यादे; मुख्य सूत्रधार मुंबईत

पंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!

टेलिकॉम क्षेत्रात आता करता येणार १००% परकीय गुंतवणूक

या प्रसंगी बोलताना भारतीय नौदलाचे कार्मिक सेवा नियंत्रक व्हाइस एडमिरल सूरज बेरी यांनी सांगितले की, “नौदलाच्या निवृत्त सैनिकांना, माजी कर्मचाऱ्यांना, आपल्या राष्ट्राच्या सेवेनंतर रोजगाराच्या संधी शोधण्यासाठीच्या सुविधा प्रदान करण्यासाठी आयएनपीए वचनबद्ध आहे. त्यातच आता कॉर्पोरेट क्षेत्रासह हे कार्य सक्षमपणे करणारे कार्यक्रम विकसित करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.आम्ही या उपक्रमाच्या अंतर्गत फ्लिपकार्ट सोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”

Exit mobile version