28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरअर्थजगतभारताची अर्थव्यवस्था येत्या सात वर्षात जगात तिसऱ्या क्रमांकावर

भारताची अर्थव्यवस्था येत्या सात वर्षात जगात तिसऱ्या क्रमांकावर

आठ वर्ष्याच्या काळात भारतच्या अर्थव्यवस्थेने झेप घेत पाचव्या स्थानावर पोहचली आहे.

Google News Follow

Related

नुकत्याच जाहीर झालेल्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारताने जगातील अव्वल पाच अर्थव्यवस्थेत स्थान मिळवले आहे. यादरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाने एक दावा केला आहे. येत्या सात वर्षात भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होऊ शकते.

एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर १३.५ टक्के इतका होता. ही गती कायम राहिल्यास भारतीय अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. तसेच येणाऱ्या काळात भारताची अर्थव्यवस्था एका उंचीवर जाऊन पोहचू शकते. २०२९ पर्यंत भारतची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार असल्याचा दावा या विभागाने केला आहे.

२०१४ मध्ये भारत आर्थिकदृष्ट्या दहाव्या क्रमांकावर होता. आठ वर्षाच्या काळात भारतच्या अर्थव्यवस्थेने झेप घेत पाचव्या स्थानावर पोहचली आहे. तर २०२९ पर्यंत भारत दोन स्थानांनी झेप घेऊन तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.

एसबीआयच्या अहवालात २०१४ पासून भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. अहवालात दावा केल्याप्रमाणे भारताने अद्याप यूकेला मागे टाकलेले नाही. जागतिक जीडीपीमध्ये भारताचा वाटा सध्या ३.५ टक्के आहे. तर २०१४ मध्ये तोच वाटा २.६ टक्के होता.

हे ही वाचा:

म्हणून बायबल हाती धरण्यास दादाभाई नौरोजींनी दिला होता नकार

सिनेमांच्या पात्रात श्रीगणेश, मनाला पटते का?

‘केरळमध्ये काम करण्यासाठी देशभक्तीबरोबरच बलिदान आणि शौर्यही हवे’

‘शबाना, नसीरुद्दीन स्लीपर सेल एजंट’

दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या GDP आकडेवारीनुसार, भारताने पहिल्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे. अमेरिका ही सध्या जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन, त्यानंतर जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. दशकभरापूर्वी या यादीत भारत ११व्या क्रमांकावर होता आणि ब्रिटन पाचव्या क्रमांकावर होता. भारताने दुसऱ्यांदा हा पराक्रम केला आहे. याआधी भारताने २०१९ मध्येही ब्रिटनला सहाव्या स्थानावर ढकलले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा