भारतीय अर्थव्यवस्थेने रविवार, १९ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी (Gross domestic product) ४ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला आहे. यासह आपण जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले आहोत. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तर चीन दुसऱ्या स्थानावर असून, जपान तिसऱ्या स्थानावर आहे. तर जर्मनी चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याचा वाढीचा वेग पाहता, अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, भारत पुढील चार वर्षांत म्हणजे २०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. येत्या काही वर्षात अमेरिका, चीन आणि भारत या जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्या अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिकेचा जीडीपी हा २५.५ ट्रिलियन डॉलर आहे. तर १८ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जपानचा जीडीपी ४.२ ट्रिलियन डॉलर्स आणि जर्मनीची अर्थव्यवस्था ही ४ ट्रिलियन डॉलर्सची आहे.
हे ही वाचा:
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त गुगलचे खास डुडल
मुंबईकर ते हिटमॅन! भारताचा कर्णधार रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास
निवृत्त आयएएस अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची संपत्ती राम मंदिराला दान
‘खर्गे यांनी माझ्या मृत वडिलांबद्दल अपशब्द वापरले’
दरम्यान, अनेक जागतिक संस्थांनी देखील असे दावे केले आहेत की, २०३० पर्यंत भारताचा जीडीपी वाढून ७.३ ट्रिलियन डॉलर होईल. जपान व्यतिरिक्त भारत २०३० पर्यंत जर्मनीलाही मागे टाकेल. या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजीसाठी वाढत्या देशांतर्गत मागणीला जबाबदार धरण्यात आले आहे.