25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतअदानी म्हणतात , भारत २०५० पर्यंत दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल

अदानी म्हणतात , भारत २०५० पर्यंत दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल

येत्या १२ ते १८ महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सने वाढेल

Google News Follow

Related

भारताला ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्यासाठी ५८ वर्षांहून अधिक वर्षे लागली आहेत, परंतु येत्या १२ ते १८ महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सने वाढेल आणि २०५० पर्यंत दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी म्हटले आहे.

२१ व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट्समध्ये भाषण करताना ते म्हणाले की, सध्या जगासमोर नवीन संकटे उभी आहेत. केंद्र सरकारने केलेल्या सामाजिक आणि आर्थिक बदलांमुळे अर्थव्यवस्थेने गती कायम ठेवली आहे. भारत पुढील दशकात दर १२ ते १८ महिन्यांनी एक ट्रिलियन डॉलर्सची भर टाकण्यास सुरुवात करेल. अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था २०५०पर्यंत ३०ट्रिलियन डॉलर्सची होईल. यासह, शेअर बाजाराचे मूल्यांकन ४५ ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढेल.

भारतातील विदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआय एक ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाईल. यावरून जगाचा भारतावरील विश्वास वाढत असल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह देशातील हरित ऊर्जा क्षेत्रात ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. याबाबत ते म्हणाले की, भारत २०५० पर्यंत हरित ऊर्जा क्षेत्रात निर्यात करणारा देश बनू शकतो.

हे ही वाचा : 

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न ७०० टक्क्यांनी वाढेल

पुढे म्हणाले की २०५० पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा २० टक्क्यांवर पोहोचेल. २०५० पर्यंत प्रत्येक भारतीयाचे सरासरी वय ३८ वर्षे असेल आणि लोकसंख्या १६० कोटींच्या पुढे जाईल. यासह, देशातील दरडोई उत्पन्न १६,०० डॉलरच्या पुढे जाईल, जे सध्याच्या दरडोई उत्पन्नापेक्षा ७०० टक्के अधिक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा