भारतीय अर्थव्यवस्था १० टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढणार

भारतीय अर्थव्यवस्था १० टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढणार

निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी काल असे प्रतिपादन केले की, या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था १०% पेक्षा जास्त वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. याला खरीप पीक, उत्तम रब्बी पिकाची संभावना आणि व्यापारातील मजबूत पुनरुत्थान यांचा आधार आहे. तथापि, पुरवठा साखळीतील मर्यादा आणि वाढत्या ऊर्जेच्या किमतींसह शाश्वत जागतिक आर्थिक पुनरुत्थानासाठी चलनवाढ हा महत्त्वाचा धोका म्हणून उदयास येत आहे. असे कुमार यांनी सावध केले.

कुमार यांच्या मते, निर्यातीतील लक्षणीय वाढ आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीला देखील चालना देईल. तर संपर्क-केंद्रित सेवा क्षेत्रात हळूहळू वाढ होण्यामुळे विकासाच्या गतीला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

“देशभर जलद लसीकरण मोहिमेमुळे भविष्यातील लाटांचा धोका कमी होईल याची खात्री होईल.” अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कुमार पुढे असं म्हणाले की, “भारतातील व्यापार वाढ जोरदारपणे परत येत आहे, निर्यातीपेक्षा खूप मजबूत आयात ही भारताची मजबूत आर्थिक स्थिती दर्शवते. “प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही करांद्वारे चालवलेल्या अपेक्षेपेक्षा जास्त महसूलाने आवश्यक धोरणात्मक कारवाईसाठी अत्यंत आवश्यक वित्तीय सूट प्रदान केली आहे.”

जागतिक स्तरावर देखील, शिपिंग आणि लॉजिस्टिक्समध्ये अडथळे असूनही जागतिक आर्थिक वाढीपेक्षा व्यापार वेगाने वाढतो आहे. असं कुमार म्हणाले. ते पुढे म्हणाले, “पुरवठ्याच्या साखळीतील मर्यादा आणि वाढत्या ऊर्जेच्या किमतींसह शाश्वत जागतिक आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी चलनवाढ हा प्रमुख धोका म्हणून उदयास येत आहे.”

हे ही वाचा:

सलमान खुर्शीद यांना, हिंदुत्वावर बरळल्यानंतर घरचा आहेर

न्यूझीलंडविरुद्ध भारताची टीम घोषित, कोण आहे नवीन कर्णधार?

खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२१ मध्ये जागतिक आर्थिक वृद्धीचा अंदाज ५.९% ने ठेवला असून प्रगत अर्थव्यवस्थांचा वास्तविक जीडीपी ५.२% ने वाढण्याचा अंदाज आहे. तर उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था ६.४% ने वाढण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version