24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतभारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची

रिझर्व्ह बँकेचा अंदाज

Google News Follow

Related

रिझर्व्ह बँकेने भारतीय अर्थ व्यवस्थेबद्दल चांगला अंदाज व्यक्त केला आहे. जग मंदीच्या सावटाखाली आहे पण भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान बळकट करेल.ज्यामुळे ती जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असे भारतीय रिझर्व्ह बँक म्हटले आहे.  चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ३.७ ट्रिलियन डॉलर्सवर जाईल असा अंदाज अंदाज रिझर्व्ह बँकेने  व्यक्त केला आहे. पाचवी सर्वात मोठी व्यवस्था म्हणून ब्रिटनला देखील मागे टाकेल असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेचा जानेवारीतील ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’ अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. आर्थिक आघाडीवर स्थिरता आहे. महागाई समाधानकारक मर्यादेत आणण्याचे चलनविषयक धोरणाचे पहिले उद्दिष्ट साध्य झाले असल्याचे अलीकडच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. असे या अहवालात म्हटले आहे. या वर्षात महागाई नियंत्रणात आणण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत महागाई निर्धारित लक्ष्यानुसार राहील असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रता पात्रा यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

भारत २०२५ पर्यंत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल आणि २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्यावेळी अर्थव्यवस्था ५.४ ट्रिलियन डॉलरवर गेलेली असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. उदयोन्मुख बाजारपेठा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक मजबूत आहेत. परंतु यावर्षात मध्ये त्यांचा सर्वात मोठा धोका अमेरिकेचे नाणेनिधी धोरण आणि डॉलर मूल्ल्याशी संबंधित आहे. असे रिझर्व्ह बँकेला म्हटलं आहे.

कंपन्यांची कामगिरी सुधारली

वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे आणि उपडे खर्च कमी झाल्याने भारतातील कंपन्यांची कामगिरी सुधारली आहे. केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर वित्तीय एकत्रीकरण सुरू आहे. प्रमुख निर्देशकांच्या आधारे, चालू खात्यातील तूट २०२२ आणि २०२३ च्या उर्वरित कालावधीसाठी कमी होण्याची शक्यता आहे या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा