शस्त्रास्त्र निर्मितीतील आत्मनिर्भरतेकडे भारताचे मोठे पाऊल

शस्त्रास्त्र निर्मितीतील आत्मनिर्भरतेकडे भारताचे मोठे पाऊल

शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱी बीईएमएल (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) या कंपनीतील आपला हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे. सरकारने हे जाहीर केल्यानंतर या कंपनीची खरेदी करण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. यामध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, अशोक लेलँड आणि भारत फोर्ज या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी बीईएमएल या शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या कंपनीला खरेदी करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (इओआय) फॉर्म जमा केला आहे.

टाटा मोटर्स, महिंद्रा आणि अशोक लेलँडसारख्या कंपन्या बीईएमएलची खरेदी करुन उत्पादन व्यवसायात प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच वाहन उत्पादन व्यवसायावरील त्यांची निर्भरता की कमी व्हावी म्हणूनसुद्धा या कंपन्या बीईएमएलची खरेदी करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

बीईएमएल या कंपनीमध्ये सरकारची जवळपास ५४ टक्के भागीदारी आहे. शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या या कंपनीमधील भागीदारी विकत घेण्याच्या लिलावात सहभाग नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने ४ जानेवारी रोजी अर्ज मागवले होते. त्यासाठीची एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फॉर्म जमा करण्यासाठीची शेवटची तारीख १ मार्च होती. ती आता सरकारने वाढवून २२ मार्च केलेली आहे.

हे ही वाचा:

आत्मनिर्भर भारताची चीनकडून होणारी आयात घसरली

बीईएमएल ही कंपनी पृथ्वी मिसाईल लॉन्चर, आर्मी ट्रांसपोर्टेशन व्हेईकल्स आणि रेल्वे तसेच मेट्रो डब्यांचे उत्पादन, माइनिंग अँण्ड कंस्ट्रक्शन, डिफेंस आणि एअरोस्पेस या सेक्टर्समध्ये काम करते. या कंपनीचे बंगळुरु, कोलर गोल्ड फील्ड्स, म्हैसूर, पालक्कड आणि चिकमंगलुरु येथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत.

दरम्यान, बीईएमएल या कंपनीतील २६ टक्के भागीदारी विकत घेण्यासाठी मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांनी उत्सुकता दाखवल्यामुळे या कंपनीचे शेअर्स २० टक्क्यांनी वाढले. सध्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत १४६८.५० रुपये आहे.

Exit mobile version