24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरअर्थजगतअर्थव्यवस्थेच्या शर्यतीत भारताने ब्रिटनला हरवले

अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत भारताने ब्रिटनला हरवले

Google News Follow

Related

भारतीय अर्थव्यवस्था सतत भक्कम राहण्याचा परिणाम दिसून येत आहे. युरोपमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीची नोंद केल्यामुळे भारताने जगातील अव्वल ५ अर्थव्यवस्थेत स्थान मिळवले आहे. सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताने ब्रिटनला मागे टाकले असून ब्रिटन आता सहाव्या स्थानावर आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या डॉलर चलनामध्ये केलेल्या गणनेनुसार, २०२१ च्या शेवटच्या तिमाहीत भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या(आयएमएफ) जीडीपी आकडेवारी नुसार २०२२ च्या पहिल्या तिमाहीत भारताने आपली वाढ मजबूत केली आहे.  या वाढीसह, भारत लवकरच वार्षिक आधारावर जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

 

ब्रिटनपेक्षा भारताची अर्थव्यवस्था किती मोठी

मार्च तिमाहीच्या अखेरीस आयएमएफने प्रसिध्द केलेली आकडेवारी आणि डॉलर विनिमय दराच्या आधारावर सर्वसाधारण रोखीत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ८५४.७  अब्ज डॉलर होता. त्याच कालावधीत, त्याच आधारावरब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा आकार ८१६ अब्ज डॉलर होता असे ब्लूमबर्गनं म्हटलं आहे. आगामी काळात भारत ब्रिटिश अर्थव्यवस्थेविरुद्ध आपली पकड आणखी मजबूत करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. किंबहुना, भारतासाठी ७% आर्थिक विकास वाढीचा अंदाज व्यक्त करण्यांत आला आहे. जी जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात मोठी आहे. दुसरीकडे, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता आहे. हे पाहता, भारत वार्षिक आधारावर डॉलर मूल्यामध्ये ब्रिटनला मागे टाकून पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

भारताच्या जीडीपीत २० वर्षात १० पटीने वाढ

वार्षिक आधारावर, भारताची अर्थव्यवस्था ३.१७ ट्रिलियनची डॉलरची आहे आणि ब्रिटन पाठोपाठ  सहाव्या क्रमांकावर आहे. ब्रिटनचा जीडीपी सध्या ३.१९ट्रिलियन डॉलर आहे. ७ टक्क्यांच्या अंदाजे वाढीसह, भारत या वर्षीही वार्षिक आधारावर ब्रिटनला मागे टाकण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, त्यानंतर चीन, जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. भारताच्या जीडीपीने गेल्या २० वर्षांत १० पट वाढ नोंदवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा